भारत-ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताला 184 धावांनी निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी सामन्यादरम्यान ‘यशस्वी जयस्वाल’सोबत (Yashasvi Jaiswal) शानदार भागीदारी केल्यानंतर आक्रमक शॉटवर विकेट गमावणाऱ्या ‘रिषभ पंत’वर (Rishabh Pant) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संतापला आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित पंतबद्दल वक्तव्य केले आहे.
यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत जेव्हा खेळपट्टीवर हजर होते, तेव्हा ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’चा (Border Gavaskar Trophy) चौथा कसोटी सामना ड्राॅकडे जात होता पण पंतने दिवसाच्या शेवटच्या सत्रात फिरकी गोलंदाज ‘ट्राविस हेड’विरूद्ध (Travis Head) आक्रमक शॉट खेळला आणि तो बाद होऊन तंबूत परतला. तो बाद होताच भारताची फलंदाजी गडगडली. दरम्यान ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी भारताचा धुव्वा उडवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
सोमवारी (30 डिसेंबर) सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहितला पंत बाद झाल्याबद्दल विचारले असता, त्याने गमतीने विचारले, आज? (किंवा) त्या दिवशी. भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “आज कोणतीही चर्चा झाली नाही, आम्ही नुकताच सामना गमावला आहे आणि त्यामुळे सर्वजण निराश झाले आहेत, आम्ही या निकालाचा नक्कीच विचार केला नाही. पंतला त्याच्यासाठी काय महत्त्वाचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे, आपल्यापैकी कोणीही त्याला सांगण्यापेक्षा या गोष्टी स्वत: समजून घेणे आवश्यक आहे.”
आता बाॅर्डर-गावसकर मालिकेतील भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना (3 ते 7 जानेवारी) सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे, तर दोन्ही संघातील 1 सामना ड्राॅ राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मेलबर्नमधील लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया, म्हणाला…
या 3 खेळाडूंमुळे मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला, सविस्तर जाणून घ्या
मेलबर्नमध्ये भारताचा पराभव, आता टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार?