तब्बल सात वर्षांनंतर मिताली राजच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय संघात काही नवीन खेळाडूंना संधी दिली गेला आहे. त्यांनी त्या संधीचे सोनेही केले आहे. त्यात एक म्हणजे, युवा महिला फलंदाज शेफाली वर्मा हिचे. तिच्या प्रदर्शनाला प्रभावित होत अगदी भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी तिचे कौतुक केले आहे.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी शेफालीची खेळण्याची शैली ही वीरेंद्र सेहवागसारखी असल्याचे सांगितले आहे. ब्रिस्टल कसोटीच्या दुसऱ्या डावात शेफाली अर्धशतक करत बाद झाली. तत्पुर्वी पहिल्या डावातही तिने ९६ धावांची दमदार खेळी केली होती.
भारत महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघांदरम्यान खेळल्या जाणार्या कसोटी सामन्यात शेफाली वर्माने भारतीय संघाच्या पहिल्या डावात वर्चस्व राखले. त्याचबरोबर ती दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी करताना अर्धशतक करत तिने मोठमोठे विक्रम आपल्या नावे केले. तिची मोहक खेळी पाहून पुरुष क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर मंत्रमुग्ध झाले. त्यांनी शेफालीच्या आक्रमक वृत्तीचे कौतुक केले.
श्रीधर म्हणाले की, “शेफाली आम्हाला विरेंद्र सेहवागची आठवण करुन देते. ज्याप्रकारे ती खेळते, त्यावरुन तिचे कौशल्य स्पष्टपणे दिसते. त्यामुळे आम्ही तिच्या खेळीचा पुरेपुर आनंद लुट आहोत. तिचे पहिल्या डावातील शतक पूर्ण झाले असते तर बरे झाले असते.”
ब्रिस्टल कसोटी हा शेफालीचा कसोटी पदार्पणाचा सामना आहे. या सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतक करत ती सर्वात कमी वयात पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात अर्धशतक करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तर पुरुष आणि महिलांमध्ये हा पराक्रम करणारी दुसरीच क्रिकेटपटू ठरली आहे.
शेफालीपुर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा या विक्रमाच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान आहे. त्याने १९९० मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणातील दोन्ही डावात अर्धशतकाहून अधिक धावा केल्या होत्या. यावेळी तो १७ वर्षे १०७ दिवसांचा होता. तर शेफालीने वयाच्या १७ व्या वर्षी १३९ दिवसांचे असताना हा किर्तीमान केला आहे. म्हणजे शेफाली आणि सचिनच्या या विक्रमांत केवळ ३२ दिवसांचा फरक आहे.
महत्वाच्या बातम्या
‘विराटच्या भिडू’ला हवी आहे अदृश्य होण्याची सुपरपावर, पण का? वाचा कारण
साउथम्पटनमधून आली आनंदाची बातमी, ऊन पडल्याने भारत-न्यूझीलंड महामुकाबला सुरू होण्याचे संकेत