यावर्षी संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषक २०२२ खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्त्व रोहित शर्माच कर्णधार असून केएल राहुल आणि विराट कोहली अशा मोठ्या खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या स्पर्धेला मुकणार आहेत. या दोघांसह एकूण अर्धा डझन खेळाडू आशिया चषकात जागा मिळवू शकलेले नाहीत.
भारतीय संघ (Team India) व्यवस्थापनाने टी२० विश्वचषक २०२१ नंतर बऱ्याचशा खेळाडूंना आजमावून पाहिले आहे. त्यापैकी बऱ्याचशा खेळाडूंनी आपल्याला मिळालेल्या संधीला दोन्ही हातांनी घट्ट पकडून भारतीय संघातील आपली जागा पक्की केली. परंतु यातील काही खेळाडू आशिया चषकासाठी १५ सदस्यीय संघात (Asia Cup Indian Squad) जागा मिळवू शकले, तर काहींना अपयश आले आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघात जागा न मिळवू शकलेल्या खेळाडूंमध्ये युवा सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) याचा समावेश आहे. आयपीएल आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या इशानला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडले गेले होते. परंतु त्याला फक्त एकाच सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली, ज्यामध्ये तो फ्लॉप ठरला होता. त्यानंतर आशिया चषकातून त्याला वगळले गेले आहे.
त्याच्याबरोबरच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात जागा मिळवलेल्या श्रेयस अय्यरलाही (Shreyas Iyer) अंतिम १५ जणांच्या संघात घेतले गेले नाही. त्याला राखीव खेळाडू म्हणून आशिया चषकात निवडले गेले आहे. याखेरीज संजू सॅमसन (Sanju Samson), अक्षर पटेल (Axar Patel) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांना न निवडण्याचा चकित करणारा निर्णयही संघ निवडकर्त्यांनी घेतला आहे.
आशिया चषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
आशिया चषकाचा संघ समोर आल्यानंतर टी-२० विश्वचषकाचे चित्र स्पष्ट? वाचा कसा असेल संघ
दु:खद! वाढदिवशीच आला काळ, गावसकरांसोबत खेळलेल्या माजी मुंबईकर यष्टीरक्षकाचे निधन
महिला क्रिकेटमधील चोकर्स ठरतेय टीम इंडिया! दरवेळी मोक्याच्या क्षणी खातायेत कच






