सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येेथील सीडन पार्क येथे रविवारी (27 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. भारतीय संघाने या मैदानावर एकूण 11 सामने खेळले आहेत, ज्यापैकी भारतीय संघ फक्त 3 सामनेे जिंकण्यात यशस्वी झाला आणि उर्वरीत 8 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड व्यतीरिक्त भारतीय संघाने या मैदानावर ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि आयर्लंड या संघाचा आमना सामना केला.
भारत आणि न्यूझीलंड संघात येथे आतापर्यंत 8 सामने खेळले गेेेले, ज्यात न्यूझीलंड संघ तब्बल 7 वेळा जिंकला. भारताला या मैदानावर एकमात्र विजय 2009मध्ये महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नेतृत्वाखाली मिळाला होता. या सामन्यात विरेेंंद्र सेहवाग (Virendra sehwag) याने धमाकेदार प्रदर्शन करत 74 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी केली होती.
हॅमिल्टनमध्ये मागील 5 सामन्यात भारताच्या नशिबी केवळ एक विजय
हॅमिल्टनमध्ये भारतीय संघाने 2015 मध्ये आयर्लंडला 8 गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात शिखर धवन (Shikhar Dhawan) याने 85 चेंडूत 100 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. याशिवाय उर्वरीत 4 सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पाराभवाचा स्वीकार करावा लागला. या मैदानावर शिखर धवन बरोबरच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) यांना खेळण्याचा अनुभव आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात कुणाचे पारडे जड?
भारत आणि न्यूझीलंड संघात आतापर्यंत 111 सामने खेळले गेले, ज्यापैकी भारतीय संघाला 55 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले, तर न्यूझीलंड संघ 50 सामन्यात विजयी झाला. याशिवाय दोन सामनेे टाय झाले आणि उरलेले 5 सामने निकाली लागू शकले नाही.
आपल्या मैदानावर न्यूझीलंड संघ दमदार
न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाने एकूण 43 सामने खेळले, यापैकी भारतीय संघाला केवळ 14 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. न्यूझीलंडने 26 सामन्यात भारताला पराभूत केले तर दोन सामन्यांचा निकाल लागू शकला नाही आणि 1 सामना टाय झाला.
मालिका जिंकण्यासाठी दोन्ही सामन्यात जोर लावावा लागणार
भारत आणि न्यूझीलंड या संघात आतापर्यंत 9 दविपक्षीय मालिका खेळल्या गेल्या, ज्यात भारतीय संघ केवळ 2 मालिका जिंकू शकला. न्यूझीलंडने भारताला 5 वेळा पराभूत केले, तर 2 मालिका बरोबरीत सुटल्या. या दोन्ही संघात शेवटची एकदिवसीय सामन्यांची मालिका न्यूझीलंडमध्ये 2020मध्ये खेळली गेली होती, तेव्हा यजमान संघाने 3-0च्या फरकाने ही मालिका आपल्या खिशात घातली होती.(Indian Team has bad record in Hamilton and managed only single win in previous 8 matches)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार भारताच्या ‘या’ फलंदाजाचा फॅन! स्वत:च सांगितले कारण, नाव ऐकून व्हाल चकित
वेस्ट इंडीजचे नेतृत्व सोडताच तळपली पूरनची बॅट; सलग दोन सामन्यात पाडला चौकार-षटकारांचा पाऊस