आयपीएल 2025 स्पर्धेत मोहम्मद शमीला अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि आता काही लोक काळजीमध्ये आहेत. त्यांना ही चिंता भेडसावत आहे की, आयपीएल स्पर्धेनंतर भारताला इंग्लंडचा दौरा करायचा आहे ज्यासाठी मोहम्मद शमी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएल 2025 स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहता इंग्लंड दौऱ्यासाठी हा एक मोठा चिंतेचा विषय आहे.
शमीने पंजाब किंग्स विरुद्ध शमीने 4 षटकात 75 धावा देऊन, एक नकोसा विक्रम तोडला होता. शमी या हंगामात त्याच्या नेहमीच्या रूपात दिसला नाही. जसे कॉमेंटेटर आकाश चोपडाने म्हटले. दुखापतीच्या कारणाने तो, आयपीएल 2024 स्पर्धा खेळू शकला नव्हता. त्याच्या पायाची 2024 मध्ये सर्जरी करण्यात आली होती.
या आधी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शमीने शानदार प्रदर्शन केलं होतं. भारतासाठी त्याने सर्वाधिक विकेट्स घेऊन स्पर्धा संपवली होती. त्याच्या या भूमिकेमुळे भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात मोठी मदत मिळाली होती.
सनरायझर्स हैदराबाद संघाचे अजून चार सामने बाकी आहेत. ते प्लेऑफच्या रेस मधून बाहेर झाले नाहीत. पण प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या खूप कमी संभावना आहेत. पुढचे चार सामने फक्त हैदराबादसाठीच पुनरागमनाची संधी नाही, तर शमीसाठी हे सिद्ध करण्याची संधी आहे की, त्याच्यामध्ये क्षमता आहे. आयपीएल हे ठरवू शकत नाही की, कसोटी सामन्यांसाठी त्याला निवडावे की नाही. शमीने जून 2023 पासून लाल चेंडू सामना खेळला नाही आणि आता गोष्टी सहज सोप्या दिसत नाहीत.