जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने आहेत. लंडनमधील ओव्हल मैदाणावर 7 जूनपासून विजेतेपदाचा सामाना खेळला जात आहे. दोन दिवसाच्या आकडेवारीकडे पाहिले तर कांगारू संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. जर भारताला सर्वबाद न होता सामन्यात कायम रहायचे असल्यास वेगळी निती खेळपट्टीवर आणावी लागेल.
जागततिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (8 जून) आस्ट्रेलिया 469 धावावर सर्वबाद झाला. यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात 5 बाद 151 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघ अजूनही 318 धावांनी पुढे आहे. तर, भारतीय संघातील अजिक्य रहाणे 29 आणि केएस भरत 5 नाबाद खेळत आहेत.
भारतीय संघाला अॅडलेडची जादू मैदानावर दाखवावी लागणार
शुक्रवार (9 जून) तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 151 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात करेल. जर, भारतीय संघाला (Team India) हा अंतिम सामना आपल्या नावावर करायचा असेल तर 20 वर्ष जुने तंत्र अमलात आणावे लागेल. याआधीही भारतीय संघाने सामना जिंकण्यासाठी हे तंत्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध वापरले होते.
मी तुम्हाला सांगत आहे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2003 च्या उत्तरार्धात झालेल्या कसोटी मालिकेबद्दल. त्या मालिकेमधील दुसरा कसोटी सामना अॅडलेड येथे 12 ते 16 डिसेंबर दरम्यान खेळला गेला होता. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाने 556 धावांची मोठी धावसंख्या भारतासमोर उभी केली. भारतीय संघातील अनिल कुंबळेने गोलंदाजी वेळी 5 विकेट घेतल्या.
आगरकरच्या 6 विकेट्सने खेळाला कलाटणी दिली
भारतीय संघ पहिल्या डावामध्ये 23 धावांनी पिछाडीवर होता, तर दुसऱ्या डावात दमदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन संघाला 196 धावांवर गारद केले. अशाप्रकारे त्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 230 धावांचे लक्ष्य मिळाले. गोलंदाजीमध्ये वेगवान असलेल्या अजित आगरकरने दुसऱ्या डावात भारतीय संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. आगरकरने 41 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने (Indian Team) 6 गडी गमावून 233 धावा केल्या. त्यावेळी भारताने 4 गडी राखून सामना जिंकला होता. आत्ता चालू सामन्यामध्ये भारताला विजयावर आपले नाव कोरायचे असल्यास अॅडलेड कसोटीची जादू वापरावी लागेल.
आता रहाणे-भरतला तिसऱ्या दिवशी आपली ताकद दाखवावी लागणार
शुक्रवार (9 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामधील तिसऱ्या दिवशी, भारतीय संघ पहिल्या डावात 5 विकेट गमावत 151 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात करेल. विजय मिळविण्यासाठी भारतीय संघाला आणखी 318 धावांची गरज आहे. अजिंक्य रहाणे (29) आणि केएस भरत (5) तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून सुरुवात करतील. आता भारतीय संघाला या सामन्यात पकड राखायची असेल तर रहाणे आणि भरत यांना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मोठी खेळी खेळावी लागेल.
ऑस्ट्रेलियन संघाने (Australia Team) पहिल्या डावात 469 धावा केल्या. खेळाच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) शानदार फलंदाजी करताना आपले शतक पूर्ण केले. तसेच, स्मिथच्या कसोटी कारकिर्दीतील हे 31 वे शतक होते. स्मिथ 121 आणि ट्रॅव्हिस हेड 163 धावांवर बाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघाचे प्लेइंग-11 खेळाडू
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियन संघ:
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क) मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video