---Advertisement---

ICC Team Ranking | ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पराभव न्यूझीलंडाला चांगलेच पडले महागात, ‘हा’ संघ बनला नंबर वन

On: गुरूवार, सप्टेंबर 8, 2022 7:33 PM
new zealand team
---Advertisement---

सध्या न्यूझीलंड संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. गुरुवारी (8 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना खेळला गेला. जयमान ऑस्ट्रेलियाने हा सामना तब्बल 113 धावांनी जिंकला आणि मालिका देखील नावावर केली. या विजयानंतर आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंडला नुकसान झाल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत सलग दोन विजय मिळवल्यानंतर इंग्लंड संघाला मात्र त्याचा मोठा फायदा मिळाला आहे. 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (AUS vs NZ) यांच्यातील या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोनच सामन्यात आयसीसी क्रमवारीत महत्वाचे बदल पाहायला मिळाली. न्यूझीलंड संघ यापूर्वी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. यापूर्वी दुसऱ्या क्रमाकावर असलेला इंग्लंड संघ आता या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. भारतीय संघ मात्र त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

पहिल्या क्रमांकावरील इंग्लंड संघाकडे सध्या 119 रेटिंग गुण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या न्यूझीलंडकडे 117 रेटिंग गुण आङेत. भारतीय संघाकडे 111 रेटिंग गुण आहेत आणि संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीचा एकंदरीत विचार केला, तर पाकिस्तान संघ 107 रेटिंग गुणांसंह चौथ्या क्रमांकावर आहे.  पाचव्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाकडे 104 रेटिंग गुण आङेत. दक्षिण आफ्रिका संघाकडे 101 रेटिंग गुण आहेत आणि तो सहाव्या क्रमांकावर आहे.

त्यानंतर एकही संघ असा नाहीये, ज्यांच्याकडे 100 किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग गुण असतील. आता पुढच्या मोठा काळ इंग्लंड या यादीतील पहिला क्रमांक कायम ठेवण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात एकदिवसीय सामने खूप कमी प्रमाणात खेळले जाणार आहेत. यादरम्यान आयसीसी टी-20 विश्वचषक आणि इतरही महत्वाचे टी-20 मालिका खेळल्या जाणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेचा विचार केला, तर सर्व सामने केर्न्स शहरात आयोजित केले गेले आहेत. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र न्यूझीलंड अवघ्या 82 धावांनी सर्वबाद झाला आणि ऑस्ट्रेलिया 113 धावांनी जिंकला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

रिषभचा पत्ता कट? कार्तिकसह हा यष्टीरक्षक खेळणार वर्ल्डकप; बीसीसीआय सूत्रांची माहिती
धक्कादायक! टीम इंडियाच्या सामन्यापूर्वीच स्टेडियमला लागली आग, टॉसला उशीर होण्याची शक्यता
अवघ्या 195 धावांचा बचाव करत ऑस्ट्रेलियाचा 113 धावांनी दणदणीत विजय; मालिकाही केली नावावर  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---