भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर १२ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी (८ ऑगस्ट) भारतीय संघाला विजयाची सुवर्णसंधी होती. परंतु, पावसाने अडथळा निर्माण केल्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. हा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ लॉर्ड्सच्या दिशेने रवाना झाला आहे.
या मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या १२ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. या सामन्याकरिता भारतीय खेळाडूंनी लॉर्ड्सच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. असे म्हटले जात आहे की, सर्व खेळाडूंची आरटी- पीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता लंडनच्या दिशेने रवाना झाले.(Indian team left for London Prithvi shaw and suryakumar yadav will remain in quarantine)
पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव नटिंघममध्येच
ही मालिका सुरू होण्यापूर्वी शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघेही दुखापतीमुळे संघांबाहेर झाले होते. यामुळे पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव या दोघांना संधी देण्यात आली होती. हे दोघेही ३ ऑगस्टला भारतीय संघासोबत जोडले गेले होते. हे दोघेही सध्या विलगीकरणाचा नॉटिंघम येथे कालावधी पूर्ण करत आहे. हा कालावधी १३ ऑगस्ट रोजी पूर्ण होणार आहे. याचा अर्थ असा की, हे दोघेही १४ ऑगस्टपासून सरावाला सुरुवात करतील. त्यानंतर २५ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या लीड्स कसोटी सामन्यासाठी हे दोघेही उपलब्ध असतील.
https://twitter.com/Wriddhipops/status/1424708439104659463
रविवारी (८ ऑगस्ट) ब्रिटन सरकारने भारतातून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग मोकळे केले आहेत. यापूर्वी त्यांच्या यादीत भारत ‘रेड’ झोनमध्ये होता. परंतु, आता भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्यामुळे ब्रिटन सरकारने भारताचा ‘एंबर’ झोन मध्ये समावेश केला आहे. याचा अर्थ असा की, कोरोनाच्या दोन्ही लस टोचून घेणाऱ्यांना इंग्लंडमध्ये येण्याची परवानगी दिली जाईल.
सौरव गांगुली देखील लावणार हजेरी
प्रवास करण्याची परवानगी मिळाल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली लॉर्ड्समध्ये दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी हजेरी लावणार आहेत. मंगळवारी(१० ऑगस्ट) सौरव गांगुली इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहेत. असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे की, बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि खजिनदार अरुण धुमाळ हे देखील एखादा सामना पाहण्यासाठी ब्रिटनमध्ये हजेरी लावू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
अँडरसनने कोहलीला ‘गोल्डन डक’ वर बाद केल्याचे पाहून दिग्गज इंग्लिश खेळाडूला झाला भलताच आनंद; म्हणाला…






