भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १२ धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १८६ धावा केल्या होत्या. भारतीय संघ प्रत्युत्तरात केवळ १७४ धावाच बनवू शकला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत एकूण ९ विक्रम बनवले.
१. ऑस्ट्रेलियाचा हा भारताविरुद्ध ९ वा टी२० विजय आहे. एकूण २३ सामन्यांत भारताने १३, तर ऑस्ट्रेलियाने ९ सामने जिंकलेले आहेत व १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
२. टी२० क्रिकेटमध्ये भारताचा हा सलग पाचवा मालिका विजय आहे. भारताने या पूर्वी बांग्लादेश, वेस्टइंडिज, श्रीलंका व न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत सलग विजय मिळवले होते.
३. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारताने मागील ७ पैकी ६ मालिका विजय मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेली मालिका बरोबरीत सुटली होती.
४. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा भारताचा हा चौथा मालिका विजय आहे. एकूण ९ मलिकांपैकी भारताने ४, तर ऑस्ट्रेलिया ने २ विजय मिळवले आहेत. ३ मलिका बरोबरीत सुटल्या आहेत
५. तिसऱ्या टी२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील २५ वे अर्धशतक पूर्ण केले. विराटने या सामन्यात ८५ धावांची उत्तम खेळी केली.
६. तिसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने आपल्या कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. वेडने आक्रमक फलंदाजी करताना ८० धावा केल्या.
७. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील आठवे अर्धशतक पूर्ण केले. मॅक्सवेलने ५४ धावांची आक्रमक खेळी केली.
८. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पराभवाने भारताचा विदेशात सलग १० टी२० सामने जिंकण्याचे खंडित झाले आहे. भारताने या पूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध ३ व न्यूझीलंड विरुद्ध ५ सामने जिंकले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील सुरुवातीचे २ सामने देखील भारताने जिंकले होते.
९. भारतीय कर्णधार विराट कोहली हा ऑस्ट्रेलियात वनडे, कसोटी व टी२० मध्ये मालिका विजय मिळवणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने यापूर्वी २०१८- १९ दौऱ्यात वनडे व कसोटीत मालिका विजय मिळवला होता
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज
टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
शार्दुलचा राग अनावर! आक्रमक फलंदाज मॅक्सवेलचा झेल सोडताच केला अपशब्दांचा वापर, पाहा Video
‘हम तो उड गए’, पॅरासिलिंग करतानाचा व्हिडिओ केला सचिनने शेअर
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…