19 नोव्हेंबर 2023 ला प्रत्येक भारतीयाच्या मनावर झालेले आघात आजही ताजे आहेत. तो दिवस देशातील कोणतीच व्यक्ती, कधीच विसरू शकणार नाही. याच दिवशी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. तर भारतीय संघ वर्ल्डकप ट्रॉफी उंचावणार हे प्रत्येक भारतीयानं मानत अगदी पक्क केलेलं, पण चतुर कांगारुंनी मोठ्या शिताफिनं भारतीय संघाला नमवलं आणि देशातील 140 कोटी लोकांचा हिरमोड केला होता. याच अंतिम सामन्याबाबत एक माहिती समोर आली आहे.
याबरोबरच आयसीसी विश्वचषक 2023 च्या फायनलपूर्वी भारताने या स्पर्धेत एकही सामना गमावला नव्हता, मात्र अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावरून भारताच्या पराभवाचे कारण खराब खेळपट्टीवर आहे. आता भारताचा माजी दिग्गज खेळाडू मोहम्मद कैफने विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवासाठी रोहित शर्मा आणि राहुल द्रविडला जबाबदार धरले आहे.
याबाबत मोहम्मद कैफने सांगितले की, अहमदाबादची खेळपट्टी अतिशय संथ बनवण्यात आली होती. तसेच अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड अनेक दिवस खेळपट्टीवर यायचे आणि तास-तास खेळपट्टीची पहाणी करत होते. यानंतर कैफ म्हणाला की, कर्णधार आणि प्रशिक्षक खेळपट्टीवर कमी पाणी टाकायला सांगत होते. तसेच खेळपट्टीवर कमी गवत ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर कैफ पुढे म्हणाला की जर खेळपट्टी सामान्य असती तर अंतिम ट्रॉफी आतापर्यंत भारताच्या हातात आली असती.
Mohammad Kaif spoke the truth about the pitch being changed in the World Cup. Rohit Sharma and Rahul Dravid were continuously checking the pitch for the last three days before the World Cup final.
The full interview on @TheLallantop app. pic.twitter.com/1vdcNtpZkc
— Vipin Tiwari (@Vipintiwari952_) March 16, 2024
दरम्यान, वर्ल्डकप 2023मध्ये भारताचे सर्व गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये होते. तर मोहम्मद शमीपासून जसप्रीत बुमराहपर्यंत आणि कुलदीप यादवपासून रवींद्र जडेजापर्यंत सगळेच फॉर्मात होते. तसेच अंतिम सामन्यातही भारतीय गोलंदाजांना सपाट खेळपट्टी मिळाली असती तर गोलंदाजांची कामगिरी सुधारली असती आणि भारतीय संघ हा सामना जिंकला असता.
महत्वाच्या बातम्या –