---Advertisement---

दीपक हुड्डाचे शतक, संजू सॅमसनची वादळी खेळी; भारताचे आयर्लंडसमोर २२६ धावांचे भलेमोठे आव्हान

Sanju-Samson-Deepak-Hooda
---Advertisement---

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात डब्लिन येथे टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत पाहुण्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर २२५ धावा केल्या आहेत आणि आयर्लंडला विजयासाठी २२६ धावांचे भलेमोठे आव्हान मिळाले आहे. भारतीय संघाला ही भलीमोठी धावसंख्या उभारून देण्यात दीपक हुड्डा याचा मोलाचा वाटा राहिला आहे. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून दीपक हुड्डा आणि सलामीवीर संजू सॅमसन यांनी विस्फोटक आणि मोठ्या खेळी केल्या. कारकिर्दीतील पाचवाच टी२० सामना खेळत असलेल्या हुड्डाने आयर्लंडच्या गोलंदाजांसाठी धू धू धुलाई केली. त्याने ५७ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०४ धावांनी वादळी खेळी केली. हे त्याच्या टी२० कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक ठरले.

तसेच ऋतुराज गायकवाडच्या जागी सलामीवीर म्हणून संधी मिळालेल्या संजू सॅमसननेही ४२ चेंडूत ७२ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ९ चौकार मारले. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार हार्दिक पंड्या (१५ धावा) आणि सूर्यकुमार यादव (१५ धावा) यांनी थोडेफार योगदान दिले. मात्र इतर फलंदाजांना साध्या एकेरी धावाही करता आल्या नाही. दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल यांनी तर पहिल्याच चेंडूवर विकेट गमावल्या.

या डावात आयर्लंडकडून मार्क ऍडेर याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकात ४४ धावा देत भारताचे ३ फलंदाज बाद केले. तसेच जोशुआ लिटर आणि क्रेग यंग यांनीही प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

तब्बल ९२ वर्षानंतर घडला इतिहास; डॅरिल मिचेलने केली ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी

किती गोड! समायराने ‘क्यूट अंदाजा’त दिली वडील रोहितच्या तब्येतीविषयी अपडेट, Video तुफान व्हायरल

ENGvsIND: ८६ कसोटींचा अनुभव असलेल्या गोलंदाजाला मिळणार का संधी? भारतीय संघापुढे मोठा प्रश्न

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---