---Advertisement---

सराव सत्र की WWE चा आखाडा? भारतीय प्रशिक्षक आणि गोलंदाजांमध्ये झाली लढाई! पहा मजेशीर VIDEO

---Advertisement---

Team India: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. आता दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. भारतीय खेळाडू सामन्यापूर्वी सराव सत्रात कसून घाम गाळत आहेत. भारतीय संघाच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, (Indian cricket team practice) जिथे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल आणि गोलंदाज अर्शदीप सिंग व आकाशदीप डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) स्टाईलमध्ये लढताना दिसत आहेत. (Team India funny moments)

दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडू अर्शदीप सिंग, आकाशदीप आणि प्रशिक्षक माोर्ने मॉर्केल मस्तीच्या मूडमध्ये दिसले. मॉर्केलने WWE स्टाईलमध्ये आधी अर्शदीपला ‘चोकहोल्ड’ केले. त्यानंतर त्याला ‘एल्बो’ देखील मारले. यानंतर आकाश दीपने अर्शदीपसोबत मिळून मॉर्केलला खाली पाडले. मग मॉर्केल उठले आणि अर्शदीपला पकडून त्याचे दोन्ही हात पाठीमागे केले. यानंतर मॉर्केल त्याला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करताना दिसले. या तिघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Morne Morkel Arshdeep Singh Akasheep WWE video)

लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघातने बॅटने खूप चांगली कामगिरी केली होती. पण क्षेत्ररक्षण आणि जसप्रीत बुमराह वगळता इतर गोलंदाजांनी खूप निराशा केली. त्यामुळेच भारतीय संघ 371 धावांसारखे मोठे लक्ष्यही वाचवू शकला नाही. इंग्लंडने पाचव्या दिवशी सहजपणे लक्ष्याचा पाठलाग करत पहिला सामना 5 विकेट्सने जिंकला. त्यामुळे इंग्लंड मालिकेत सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. (India vs England 1st Test)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. भारतीय सघाने या मैदानावर आजपर्यंत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. भारतीय संघाने येथे 8 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इतिहास रचणार का? हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल. (Edgbaston Test record India)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---