भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका(India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये लवकरच ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आली नाहीये. त्यामुळे भारतीय संघ ही मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान भारतीय संघातील काही खेळाडूंकडे इतिहास रचण्याची संधी देखील असणार आहे.(India’s tour of South Africa)
विराट कोहली पूर्ण करणार ८ हजार धावा
भारतीय कर्णधार विराट कोहली याला (Virat Kohli) ८००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या १९९ धावांची आवश्यकता आहे. त्याने ९७ कसोटी सामन्यात ७८०१ धावा केल्या आहेत. तसेच त्याला मालिकेतील तिन्ही कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली, तर मालिकेतील शेवटचा सामना हा त्याच्या कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. तसेच त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत ५५८ धावा केल्या आहेत.
पुजारा आणि रहाणे पूर्ण करणार १ हजार धावा
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा(Cheteshwar pujara) आणि संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे(Ajinkya Rahane) हे मोठा विक्रम करण्यापासून काही पाऊल दूर आहेत. हे दोघेही सध्या साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. परंतु, त्यांना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध १००० धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत एकूण १४ कसोटी सामन्यात ७५८, तर अजिंक्य रहाणेने ७४८ धावा केल्या आहेत.
आर अश्विन तोडणार डेल स्टेनचा विक्रम
आर अश्विनलाही दक्षिण आफ्रिकेत मोठा विक्रम करण्याची संधी आहे. आर अश्विनने (R Ashwin)आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ४२७ गडी बाद केले आहेत. आगामी कसोटी मालिकेदरम्यान, तो रिचर्ड हेडली, रंगना हेरथ आणि कपिल देव यांसारख्या दिग्गजांना मागे सोडू शकतो. डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमध्ये ४३९ गडी बाद केले आहेत. या मालिकेत १३ गडी बाद करताच तो डेल स्टेनला ही मागे टाकेल.
मोहम्मद शमी कसोटी क्रिकेटमध्ये पूर्ण करणार दुहेरी शतक
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी(Mohammad Shami) कडे देखील कसोटी क्रिकेटमध्ये २०० गडी बाद करण्याची सुवर्णसंधी असणार आजे. त्याने आतापर्यंत १९५ गडी बाद केले आहेत. ५ गडी बाद करताच हा कारनामा करणार आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत ५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २१ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण
काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ