खेळ म्हटलं की फिटनेस ही गोष्ट महत्त्वाची ठरते. आता तर जसजशा स्पर्धा वाढल्या आहेत, तसे फिटनेसला अधिकच महत्त्व आल्याचे दिसून येत आहेत. अनेक खेळाडू खेळाच्या सरावाबरोबरच आपला फिटनेस चांगला कसा राहिल, याकडे लक्ष देताना दिसतात. असे असतानाच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्ड आता फिटनेसच्या बाबतीत कुठलीच हयगय करणार नाही. संघ निवडताना खेळाडूला अधिक कठीण परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे बोर्डाने नियमावली जाहीर केली आहे. २ किलोमीटर धावण्यासाठी जेवढा वेळ दिला होता तो अजून कमी करण्यात आला आहे. त्यामुळे जर आता एखादा खेळाडू २ किलोमीटर ८.५५ मिनिटांत शर्यत पूर्ण करू शकला नाही, तर त्याला संघात निवडलं जाणार नाही.
श्रीलंका बोर्डने यावर्षीच यो-यो चाचणीच्या (Yo-Yo Test) ऐवजी ही २ किमी धावण्याची चाचणी सुरु केली. यो-यो चाचणीत खेळाडूंना २ किमी धावण्यासाठी ८.३५ मिनिटं होती, पण सल्लागार समितीने याचा वेळ वाढवून ८.५५ मिनिटं केली.
पण, आता निवडकर्त्यांची अशी इच्छा आहे की खेळाडूंनी ८.१० मिनिटांच्या आतच २ किमी धावून पूर्ण केले पाहिजे. तसेच जे खेळाडू या ८.३५ मिनिटांच्या आत धावून पूर्ण करतील त्यांनाच संघात निवडण्यात येईल. पण बोर्ड वर्षाच्या करारामधून थोडे पैसे कापून घेणार आहे.
फिटनेसबाबत कुठलीच हयगय सहन केली नाही: एसएलसी (SLC)
श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या (Srilanka Cricket Board) निवडकर्त्यांच्या समितीचे अध्यक्ष प्रमोदया विक्रमसिंघे (Pramodya Wickramasinghe) म्हणाले, “जर एखादा खेळाडू २ किमी धावणं ८.३५ मिनिटांत करत असेल, तर आता तसं ८.१० मिनिटांतच करावी लागणार. त्यामुळे खेळाडूंनी त्यांच्या फिटनेसकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि आम्हीसुद्धा हयगय झालेली खपवून घेणार नाही.”
ते पुढे सुद्धा म्हणाले, “काही महिन्यांपासून खेळाडूंच्या फिटनेसमध्ये सुधारणा झाली आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे बघताना खेळाडूंना अजून भक्कम होणं गरजेचं आहे.”
७ जानेवारीला होणार पहिली फिटनेस चाचणी
श्रीलंकाच्या खेळाडूंची पहिली फिटनेस चाचणी ७ जानेवारीला होणार आहे. त्यामध्ये सर्व खेळाडूंना भाग घेणं गरजेचं आहे. आणि खेळाडूंची कुठल्याही महिन्यात चाचणी घेतली जाऊ शकते.
श्रीलंकाचा माजी महान फलंदाज महेला जयवर्धनेला (Mahela Jayawardene) सल्लागार प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आलं आहे. २०२२ पासून तो एका वर्षासाठी संघाचा भाग असेल. जयवर्धने आल्यानंतर संघात काही बदलसुद्धा होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ विराट-अश्विन नाही, तर ‘या’ भारतीय खेळाडूंनाही दक्षिण आफ्रिकेत मोठे विक्रम करण्याची सुवर्णसंधी
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण