भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूडचे खूप जुने नाते आहे. अनेक खेळाडूंचे बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न झाले आहे आहे. अगदी टायगर पतौडी-शर्मिला टागोर पासून विराट कोहली-अनुष्का शर्मापर्यंत अनेक अशी खेळाडू-अभिनेत्रींच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. सध्या भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्यात अफेअर असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाले आहे. त्यातच अथियाने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे तर या चर्चांना अधिक उधाण आले आहे.
तरी, अजून केएल राहुल किंवा आथिया शेट्टीकडून त्यांच्यातील नात्याबद्दल कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, त्या दोघांना कळत नकळत अनेक ठिकाणी लोकांनी सोबत पाहिले आहे.
नुकताच अथियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये चहाचा कप दिसून येत आहे. हा फोटो पोस्ट करत अथियाने लिहिले की, ‘ब्लेस यू, रजल आरोरा.’ या फोटोमध्ये लिहिलेल्या नावासोबत अथियाने दिलचे इमोजी देखील टाकला आहे. रजल अरोराचे नाव टाकल्याने अथिया इंग्लंडमध्ये केएल राहुलसह असल्याचे कयास अनेक चाहत्यांनी लावला आहे.
कोण आहे रजल आरोरा?
रजल आरोरा ही भारतीय संघाची प्रोड्युसर आहेत आणि सध्या भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये आहे. बीसीसीआय जे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात, ते रजल अरोराच्या देखरेखीखाली तयार होत असतात. पण ज्याअर्थी रजलचे नाव अथियाने तिच्या पोस्टमध्ये टाकले आहे, त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की अथिया इंग्लंडमध्येच असून केएल राहुल बरोबर आहे.
याआधीही जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यापूर्वीच आथियाने इंग्लंडमधील एका डेस्टिनेशनचा फोटो शेअर केला होता, जो केएल राहुलने देखील शेअर केला होता. तेव्हापासूनच हे दोघे एकत्र आहेत, असा चाहत्यांकडून अंदाज वर्तविला जात होता. पण अजूनही हे नाते राहुल आणि अथियाने सार्वजनिक केलेले नाही.
केएल राहुल सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत. केएल राहुलला जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामन्यांमध्ये खेळणाऱ्या 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नव्हते. परंतु, ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
क्षणभर विश्रांती! इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू करतायेत इंग्लंडमध्ये ‘चिल’
‘पुढच्यावेळी तुझ्याशिवाय फोटो काढणार नाही’, सूर्यकुमारने ‘तशी’ कमेंट करताच कर्णधार शिखर धवनचे उत्तर
विम्बल्डनला आली सचिन-विराटची आठवण, शेअर केला व्हिडिओ