---Advertisement---

तिसऱ्या कसोटीत आर अश्विनला मिळू शकते ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी, जाणून घ्या काय आहे कारण

---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये आर अश्विनला भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली नव्हती. परंतु, तिसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन खेळताना दिसू शकतो.

या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर पार पडणार आहे. या कसोटी सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर, इंग्लंड संघ जोरदार पुनरागमन करून बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू मैदानावर जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. ज्याचा फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोमध्ये संघातील सर्व खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहे. परंतु, मुख्य बाब म्हणजे आर अश्विन देखील नेट्समध्ये घाम गाळताना दिसून आला आहे. ज्यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, हेडिंग्ले कसोटीत भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघामध्ये स्थान दिले जाऊ शकते.

अश्विनला रवींद्र जडेजा ऐवजी संघात स्थान दिले जाऊ शकते. कारण जडेजा पहिल्या दोन कसोटी सामन्यात फलंदाजीत यशस्वी ठरला असला तरी, गडी बाद करण्यात अपयशी ठरला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, आर अश्विनला संघात स्थान दिले जाईल. परंतु, त्याच्याऐवजी ईशांत शर्माला संघात स्थान दिले गेले होते. कोहलीच्या या निर्णयावर अनेकांनी टीका देखील केली होती.(Indian team practiced for the third test ashwin also appeared in the nets)

 

लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय 
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलमीवीर फलंदाज लवकर माघारी परलते होते. त्यानंतर कर्णधार रूटने एकहाती झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला देखील मोठी खेळ खेळता आली नाही, तो अवघ्या ३३ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर जोस बटलरने शेवटी २५ धावांची खेळी केली. परंतु, त्याला देखील हा सामना वाचवता आला नाही. अखेर भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाजांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे १२० धावांत कोसळला. हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

एकेकाळी ज्याच्याबरोबर झाला होता वाद, आज तोच खेळाडू उतरला जस्टीन लँगरच्या समर्थनार्थ

पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये अशी राहिली आहे भारताची कामगिरी, ऍथलेटिक्समध्ये मिळाली आहेत १० पदके

“मला वाटले नव्हते की, जो रूट विराटच्या पुढे जाईल”, कोहलीच्या प्रशिक्षकानेच व्यक्त केले आश्चर्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---