---Advertisement---

Video: विराटचा कव्हर ड्राईव्ह, तर ईशांतचा बाऊन्सर; दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघाने कसली कंबर

On: सोमवार, डिसेंबर 20, 2021 2:29 PM
Virat Kohli-Ishan-Sharma
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) हे दोन्ही बलाढ्य संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर रोजी जोहान्सबर्गमध्ये (Johanasburg) पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने गेल्या काही वर्षापासून कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. मायदेशातच नव्हे, तर परदेशात जाऊन देखील भारतीय संघाने विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाला धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीच्या(Virat Kohli) हाती आहे, तर रोहित शर्माच्या(Rohit Sharma) अनुपस्थितीत संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलला देण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघातील खेळाडू नेट्समध्ये घाम गाळताना दिसून येत आहेत. तुम्ही पाहू शकता की, राहुल द्रविड संघातील खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसून येत आहे, तर ईशांत शर्मा विराट कोहलीला गोलंदाजी करताना दिसून येत आहे. तसेच शार्दुल ठाकूर देखील पॅड्स घालून फलंदाजी करताना दिसून येत आहे.

https://twitter.com/BCCI/status/1472788564366684160?t=JycGOfZZNtSaM3q-219uMQ&s=19

हा दौरा विराट कोहली आणि संघातील काही खेळाडूंसाठी महत्वाचा असणार आहे. कारण गेल्या २ वर्षांपासून कर्णधार विराट कोहलीला शतक झळकावता आले नाहीये, तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दिग्गज खेळाडूंसाठी चांगली कामगिरी न केल्यास हा दौरा शेवटचा दौरा ठरू शकतो. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी करून विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच ईशांत शर्मा देखील गेल्या काही सामन्यांपासून फ्लॉप ठरतोय. त्यामुळे तो देखील या दौऱ्यावर चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

‘पत्नी आणि गर्लफ्रेंड खूपच ताण देतात’, वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या त्या प्रश्नावर गांगुलीचे लक्षवेधी उत्तर

वेगवान गोलंदाजीत हातखंडा असलेला इंग्लिश बॉलर अचानक करू लागला ऑफ स्पिन; पाहून आयसीसीही थक्क

या’ ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीची केली खूपच घाई, अजूनही करू शकले असते दमदार प्रदर्शन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---