---Advertisement---

केपटाऊनच्या मैदानावरील रेकॉर्ड वाढवू शकतो टीम इंडियाची चिंता, असा आहे कसोटी सामन्यांचा इतिहास

On: मंगळवार, जानेवारी 11, 2022 5:06 PM
Team India
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला होता, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर पार पडणारा अंतिम सामना हा निर्णायक सामना असणार आहे. 

भारतीय संघाला या मालिकेत विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, केपटाऊनच्या मैदानावरील आकडेवारी पाहता, भारतीय संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. केपटाऊनच्या मैदानावरील कामगिरी पाहिली, तर भारतीय संघाला गेल्या २९ वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आला नाहीये. भारतीय संघाने या मैदानावर ५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत. तर दोन कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Indian team record at Cape town)

भारतीय संघाने १९९३ मध्ये केपटाऊनच्या मैदानावर पहिला सामना खेळला होता जो अनिर्णीत राहिला होता. त्यानंतर १९९७ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघाला २८२ धावांनी पराभूत केले होते. २००७ मध्ये झालेल्या सामन्यात देखील दक्षिण आफ्रिका संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता. २०११ मध्ये या मैदानावर झालेला सामना अनिर्णीत राहिला होता.

हे नक्की पाहा:

द्रविडला 'जॅमी' टोपणनाव पडलं तरी कसं? | Story behind Rahul Dravid Nickname JAMMY

साल २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली झालेल्या सामन्यात भारतीय संघाला ७२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु, यावेळी भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. ज्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. तब्बल २९ वर्षानंतर भारतीय संघाला विजय मिळवून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. यासह भारतीय संघ ही मालिका २-१ ने आपल्या नावावर  करू शकतो.

महत्वाच्या बातम्या :

”त्या वरीष्ठ खेळाडूला संघात सामील करण्यास विराटने दिला होता नकार”

विक्रमांची लागणार रास! केपटाऊन कसोटीत तब्बल सात खेळाडूंकडे पराक्रमांची सुवर्णसंधी

व्याजासकट परतफेड! न्यूझीलंडने ३ दिवसात बांगलादेशला चारली पराभवाची धूळ; क्लीन स्विपची नामुष्कीही टळली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---