रवी शास्त्री (ravi shastri) आणि विराट कोहली (virat kohli) या गुरु-शिष्याच्या जोडीने भारतीय संघाला अनेक सामने आणि मालिका जिंकवून दिल्या आहेत. रवी शास्त्री आता भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले आहेत. टीव्हीवर त्यांनी समालोचक म्हणून पुनरागमन केले आहे. अशात ते अलिकडच्या काही दिवसांपासून त्यांचे जुने किस्से सांगत आहेत. आता शास्त्रींनी एका खेळाडूला संघात सामील करण्याविषयी एक किस्सा सांगितला आहे, जेव्हा कर्णधार विराट कोहलीने यासाठी स्पष्ट नकार दिला होता.
शास्त्रींना सांगितले की, २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर, जेव्हा सर्वांनी शिखर धवन (shikhar dhawan) याला कसोटी संघात सामील करण्याविषयी चर्चा केली, तेव्हा विराट कोहलीचे मत थोडे वेगळे होते. एका कार्यक्रमादरम्यान शास्त्रींनी सांगितले की, जेव्हा मुरली विजय शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरा झाला नव्हता, तेव्हा त्यांनी शिखर धवनला संघात सामील करण्याची मागणी केली.
शिखर धवनला त्यावेळी कसोटी संघात सामील करण्यापूर्वी त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले होते. अशात शास्त्रींनी विराटसोबत त्याला संघात सामील करण्याविषयी चर्चा केली. शास्त्री म्हणाले की, ” मी विराटला म्हणालो शिखर धवन संघात येऊ शकतो. त्याच्यासाठी स्पर्धा चांगली राहिली आहे. परंतु, विराटने स्पष्ट नकार दिला.”
तेव्हा विराट म्हणाला होता की, “आपण आधीच कोणालातरी संधी देण्याचा विचार केला आहे. अशात आपल्याला त्याच रणनीतीवर काम करायचे आहे.” मात्र, शास्त्रींनीनंतर जोर दिल्यामुळे शिखर धवनला संधी मिळाली. धवनने संघात पुनरागमन करताना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १९० धावांची खेळी केली. भारतीय संघाने या कसोटी सामन्यात विजय मिळवला होता.
दरम्यान, मागच्या वर्षी पार पडलेल्या टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्रींना भारतीय संघासोबतचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. शास्त्रींनीही या पदासाठी पुन्हा अर्ज केला नाही. राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीतून बाहेर पडल्यानंतर शास्त्रींनी पुन्हा एकदा टीव्हीवर पुनरागमन केले आहे. प्रशिक्षकपद सोडल्यानंतर त्यांनी संघनिवडीवर अनेकदा वक्तव्ये केली आहेत.
महत्वाच्या बातम्या –
विराटने पत्रकार परिषदेत सांगितला धोनीने दिलेला ‘तो’ सल्ला, म्हटला ‘आयुष्यभर लक्षात ठेवलाय’
मयंकला मागे टाकत ‘विश्वविक्रमी’ एजाज पटेलने पटकावला आयसीसीचा मानाचा पुरस्कार
व्हिडिओ पाहा –