मुंबई | भारतीय संघाच्या ट्वीटर अकाऊंटवरुन यावर्षी अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले. त्यात संघ जिंकल्यानंतर किंवा खेळाडू परदेश दौऱ्यावर असल्यावर तेथील गमतीजमतीचे व्हिडिओंचा यात समावेश आहे. तसेच या क्षणांचे संपुर्ण व्हिडीओ हे बीसीसीआयच्या संकेत स्थळावरही शेअर केले जातात. यामुळे कोणत्या व्हिडीओला किती लोकांनी पाहिले हे चटकन समजते.
२०१८मध्ये रविंद्र जडेजा आणि विराट कोहली यांच्यातील क्षेत्ररक्षणासाठी लागलेल्या स्पर्धेचा व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झाला आहे. याची माहिती थेट बीसीसीआयनेच ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. हा व्हिडीओ सर्वाधिक पाहिला गेलेला २०१८ मधील व्हिडीओ आहे असा ट्वीट बीसीसीआयकडून करण्यात आला आहे.
कधीचा आहे हा व्हिडीओ-
29 आॅक्टोबर 2018 रोजी भारत विरुद्ध विंडीज संघात चौथा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 224 धावांनी विजय मिळवला. भारताकडून रोहित शर्मा आणि अंबाती रायडूने शतकी खेळी केली. तर खलील अहमद आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3 विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात भारताच्या विजयाबरोबरच रविंद्र जडेजा आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीमध्ये मैदानावरच एक छोटी पण मजेदार शर्यत बघायला मिळाली होती.
ही शर्यत भारताने दिलेल्या 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग विंडीजचा संघ करत असताना पहायला मिळाली . विंडीजच्या डावात पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर सलामीवीर फलंदाज चंद्रपॉल हेमराजने आॅफ साइडला फटका मारल्यानंतर तो चेंडू चौकार जाण्यापासून अडवण्यासाठी विराट धावला.
पण त्याने मधेच जडेजालाही धावताना पाहिले. त्यानंतर ते दोघेही चेंडूमागे सोबत पळाले. अखेर विराटने त्याचा वेग कमी केला आणि जडेजाने पुढे जात तो चेंडू अडवत कोहलीकडे सोपवला.
त्यांच्या या छोट्या शर्यतीचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केला होता.
पहा संपुर्ण व्हिडीओ-
One of the most viewed videos from 2018 – The running race @imjadeja vs @imVkohli #BestOf2018 pic.twitter.com/DJ3ypuOZ7f
— BCCI (@BCCI) December 31, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–स्म्रीती मानधना ठरली २०१८ ची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
–मेलबर्न कसोटीतील विजयामुळे टीम इंडियाला झाला मोठा फायदा
-‘बाप’माणूस रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर