जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (WTC) अंतिम सामन्यासाठी संघाची घोषणा केली गेली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मंगळवारी (25 एप्रिल) आपला 15 सदस्यीय संघ घोषित केला. यात अजिंक्य रहाणे याला कसोटी संघात पुन्हा एकदा निवडले गेले आहे. तर सूर्यकुमार यादवा संघातून वगळण्यात आले आहे. निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाटी निवडलेल्या या संघावर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील खुश आहेत.
बीसीसीआयकडून मंगळवारी दुपारी डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी संघ घोषित केल्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही काहीच वेळा ट्वीट करून समर्थन दाखवले. आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शास्त्रींनी ट्वीट केले की, “सर्वोत्तम संघाची निवड केली गेली आहे. निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने खूप चांगले काम केले आहे.”
Best Indian team selected. Well done selectors and team management 🇮🇳 #WTCFinal2023 #TeamIndia pic.twitter.com/olIK46GO96
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) April 25, 2023
दरम्यान, डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचा कर्णधार असेल. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएस भरत याला निवडले गेले आहे. वेगवान गोलंदाजीची कमान मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकड यांच्याकडे असेल. तर फिरकी गोलंदाज म्हणून रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संधी मिळाली आहे. अष्टपैलूं खेलाडूंच्या रूपात शार्दुल ठाकुरला निवडले गेले आहे. फलंदाजी आक्रमणात शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि केएल राहुल यांचा समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना 7 जुन रोजी इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर सुरू होईल.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडलेला संघ रवी शास्त्रींना आवडला असला, तरी अनेकजण यावर नाराजी देखील व्यक्त करत आहे. मागच्या काही रणजी हंगामांमध्ये सरफराज खान याने आपल्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर सर्वाचे लक्ष वेधले. मात्र, यावेळीही निवडकर्त्यांनी सरफराजला भारतीय संघात निवडले नाहीये. दरम्यान, ही सलग दुसरी वेळ आहे, जेव्हा भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात खेळेल. मागच्या वेळी (2021) डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. (Indian team selected for WTC final is best said Ravi Shastri)
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यातसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादचा सलग तिसरा पराभव कोच लाराच्या जिव्हारी; म्हणाला, ‘खेळपट्टीमध्ये गडबड नव्हतीच…’
WTC फायनलसाठी निवडलेल्या खेळाडूंपैकी 3 गुजरातचे, पाहा तुमच्या फेवरेट टीममधील किती खेळाडू संघात