भारतीय संघाने मागीलवर्षी सुरुवातील न्यूझीलंड दौरा केला होता. या दौऱ्यात भारताला २ समन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश स्विकारावा लागला होता. मात्र त्या मालिकेत भारताने विजय मिळवायला पाहिजे होता, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक फलंदाज तसेच भारतीय संघासाठी एक कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामना खेळणारे सबा करीम यांनी मांडले आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार सबा करीम म्हणाले की, गेल्यावेळी न्यूझीलंडकडून भारत पराभूत झाल्याने मला धक्का बसला होता आम्ही ती मालिका जिंकली पाहिजे कारण जर आम्ही दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूची तुलना केली तर आमचा संघ फार मजबूत होता, तथापि दोन-तीन सत्रांमध्ये आमचा खेळ चांगला नाही झाला आणि त्यामुळे ०-२ ने आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला.
भारताकडे न्यूझीलंडला पराभूत करण्याची उत्तम संधी होती – सबा करीम
सबा करीम म्हणतात ती एक अशी मालिका होती हे भारताने जिंकली पाहिजे होती कारण त्यावेळी आमची तयारी प्रचंड होती, पण दुसऱ्या संघाने चमकदार कामगिरी केली किंवा नशिबाचा कौल त्यांच्या बाजूने गेला आणि त्यांनी याच संधीचा फायदा घेतला त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
सबा करीम यांच्या म्हणण्यानुसार २०२० मध्ये भारताला न्युझीलंडच्या संघाला हरवण्याची सुवर्णसंधी होती, कारण त्याआधी भारतीय संघाने वेगवान गोलंदाजांच्या उपयुक्त खेळपट्टीवर चांगला सराव केला होता आणि त्यांची तयारीही चांगली होती, तरीसुद्धा पराभव त्यांच्या पदरात पडल्याने सर्वांची निराशा झाली.
सबा करीम यांनी मागील वर्षी बीसीसीआयच्या मार्गदर्शक भाग प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“आयपीएलमध्ये जर मला संधी मिळाली, तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेन”
टॉप ४ : भारतात पदार्पण केलेले इंग्लंडचे खेळाडू, ज्यांना पुढे दिग्गज म्हणून ओळखले गेले