क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी 5 सप्टेंबर रोजी 15 सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली. मागील वनडे विश्वचषक 2019 स्पर्धेत भारताने उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली होती. मात्र, न्यूझीलंड संघाने भारताला पराभवाचा धक्का देत स्पर्धेतून बाहेर काढले होते. मागील विश्वचषकानंतर आता जाहीर झालेल्या भारतीय संघात अनेक मोठे बदल झाले आहेत. मागील विश्वचषकात विराट कोहली कर्णधार होता आणि रोहित शर्मा उपकर्णधार होता. यावेळी नेतृत्वाची धुरा रोहितच्या खांद्यावर आहे. तसेच, उपकर्णधार हार्दिक पंड्या आहे. संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे मागील विश्वचषकाचा भाग होते, पण यावेळी त्यांना भारतीय संघातून बाहेर बसवले आहे.
मागील विश्वचषकातील खेळाडू या विश्वचषकातून बाहेर
वनडे विश्वचषक 2019 (ODI World Cup 2019) स्पर्धेत खेळणारे 9 खेळाडू यावेळी विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग नाहीयेत. या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. महेंद्र सिंग धोनी याने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच, मयंक अगरवाल, शिखर धवन, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वर कुमार हे खराब फॉर्मचा सामना करत होते. त्यामुळे या खेळाडूंना जागा मिळाली नाही. त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मागील वर्षी रस्ते अपघातात दुखापतग्रस्त झाला होता. तो दुखापतीतून बरा होत आहे.
‘या’ 9 खेळाडूंना मिळाली नाही संधी
भारतीय संघाच्या 2023 विश्वचषक संघात मागील विश्वचषकातील 9 खेळाडूंचा समावेश नाहीये. त्या खेळाडूंमध्ये मयंंक अगरवाल, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, एमएस धोनी, शिखर धवन, केदार जाधव, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे.
वनडे विश्वचषक 2019साठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अगरवाल, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, केएल राहुल, शिखर धवन, रवींद्र जडेजा, केदार जाधव, विजय शंकर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.
मागील 10 वर्षांपासून जिंकली नाही आयसीसी ट्रॉफी
भारतीय संघाने अखेरची आयसीसी ट्रॉफी 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात जिंकली होती. त्यावेळी भारताचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) होता. मात्र, त्यानंतर 10 वर्षांमध्ये भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाहीये. यावेळी विश्वचषक भारतात होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ विजयासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघात यावेळी नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल indian team squad icc odi world cup 2023 change last world cup ms dhoni know here
हेही वाचाच-
‘स्विंग किंग’ भुवीचे टीम इंडियातील पुनरागमनावर लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘मला फरक पडत नाही आणि मी…’
बांगलादेशला मोठा झटका! पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधीच ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर