---Advertisement---

तयारी हेडिंग्ले कसोटीची! मालिकेत २-० ने आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ गाळतोय घाम, पाहा फोटो

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 10:33 PM
---Advertisement---

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. तसेच या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडींग्लेच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ मैदानावर कसून सराव करताना दिसून येत आहे. ज्याचे फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

भारतीय संघातील पहिल्या दोन कसोटी सामन्यात अप्रतिम खेळी केली आहे. त्यामुळे २५ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारतीय संघातील खेळाडू चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेऊ शकतो. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीसह संघातील इतर खेळाडू देखील मैदानात घाम गाळताना दिसून येत आहे.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भारतीय संघातील खेळाडू सराव करत असतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल फलंदाजी करताना दिसून येत आहेत. तर ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसून येत आहेत. हेडिंग्लेच्या मैदानावर हा भारतीय वर्तमान संघातील खेळाडूंचा पहिलाच सामना असणार आहे. या खेळाडूंपैकी एकाही खेळाडूला हेडिंग्लेच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव नाही.(Indian team started practicing in headingley,see photos shared by bcci)

https://twitter.com/BCCI/status/1429458221073264642?s=19

तसेच रोहित शर्मा आणि रिषभ पंत देखील मैदानावर कसून सराव करताना दिसून येत आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा देखील सराव करताना दिसून येत आहेत. ज्यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, तिसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन प्लेइंग इलेव्हेनमध्ये खेळताना दिसून येऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

रवी शास्त्रींना तिसऱ्या कसोटीपूर्वी बाउन्सर, यॉर्कर आणि बीमरची झाली आठवण; वाचा नक्की काय आहे भानगड

वयाच्या १९ व्या वर्षी सचिनने रचलेला लीड्सवर इतिहास, याच मैदानावर रंगणार तिसरी कसोटी

तिसऱ्या कसोटीत आर अश्विनला मिळू शकते ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी, जाणून घ्या काय आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---