येत्या काही दिवसात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मर्यादीत षटकांची मालिका रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशातच विलागिकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय संघाने जोरदार सरावाला सुरुवात केली आहे.
भारतीय वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असल्यामुळे श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे देण्यात आले आहे. तर उप-कर्णधारपद भुवनेश्वर कुमारच्या हाती देण्यात आले आहे. अशातच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने शुक्रवार (२ जुलै) पासून कोलंबोमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. (Indian team started their practice session for upcoming series against srilanka)
या संघात चेतन सकारिया, कृष्णप्पा गौतम, नितीश राणा, देवदत्त पडिक्कल, वरुण चक्रवर्ती आणि ऋतुराज गायकवाड असे ६ युवा खेळाडू आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. तसेच पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्यावर संघाला जोरदार सुरुवात करून देण्याची जबाबदारी असणार आहे. भारतीय संघ सोमवारी इथे पोहोचला होता. ज्यानंतर ३ दिवस त्यांना विलगिकरणात राहावे लागले होते. ही मालिका आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणार आहे.
📸📸 Snapshots from #TeamIndia's first training session in Sri Lanka 💪💪#SLvIND pic.twitter.com/hzBx8DNye2
— BCCI (@BCCI) July 2, 2021
असे आहे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १३ जुलै
२) दुसरा वनडे सामना – १६ जुलै
३) तिसरा वनडे सामना – १८ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २१ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २२ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २५ जुलै
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज :
ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
दहाव्या नंबरवर फलंदाजीला येत एकट्याच्या जीवावर भारताला दिवसा चांदणे दाखवणारा अवलिया क्रिकेटर
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
बहुचर्चित द हंड्रेड लीगचा ‘असा’ आहे फॉरमॅट, वाइल्ड कार्ड ड्राफ्टद्वारे खेळाडूंची होणार निवड