---Advertisement---

IND vs ENG: विराटच्या जागी नंबर 4 वर कोण? रोहितच्या जागी सलामीला कोण? रिषभ पंतने स्पष्टच सांगितलं

On: बुधवार, जून 18, 2025 10:06 PM
---Advertisement---

India vs England Test Series: फक्त 2 दिवसांनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला जाईल. या सामन्यापूर्वी चाहत्यांमध्ये मोठा प्रश्न होता की, विराट कोहलीच्या जागी नंबर 4 वर कोण फलंदाजी करणार? यासोबतच, रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सलामीच्या जोडीबाबतही प्रश्नचिन्ह होते. हेडिंग्ले कसोटी सामन्यापूर्वी भारतीय उपकर्णधार रिषभ पंतने कोहलीची जागा घेणाऱ्या फलंदाजाचे नाव सांगितले आहे. (Team India Batting Order)

भारतीय संघाचा नवा कसोटी उपकर्णधार रिषभ पंत हेडिंग्ले कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत आला होता. तिथे त्याने पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या बॅटिंग ऑर्डरवर मोठा खुलासा केला आहे. पंतच्या मते, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल हीच सलामीची जोडी म्हणून दिसणार आहे. या दोघांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये सलामीची फलंदाजी एकत्र केली होती. (Yashasvi Jaiswal And KL Rahul Opening)

विराट कोहलीची जागा आता नवा कर्णधार शुबमन गिल घेऊ शकतो. पंतने सामन्यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, गिलच नंबर 4 वर फलंदाजी करताना दिसेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रमाणेच पंत इंग्लंडमध्येही नंबर 5 वरच फलंदाजी करताना दिसेल. पण, पंतने सोबतच सांगितले की, नंबर 3 वर कोण फलंदाजी करणार हे अद्याप चर्चेचा विषय बनले आहे. (Team India Batting Order)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ- शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा (India Test Squad)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---