महिला टी20 विश्वचषक (Women’s T20 World Cup 2024) चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आता सर्व सामने बांगलादेशऐवजी यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना दुबईत रंगणार आहे. दरम्यान महिला टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरलेले सर्व 10 संघ स्पर्धेपूर्वी प्रत्येकी दोन सराव सामने खेळतील.
28 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि स्कॉटलंड व श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यांनी सराव सामन्यांना सुरुवात होईल. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना 29 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंड आणि त्यानंतर 1 ऑक्टोबरला दुबईत वेस्ट इंडिजशी होणार आहे. सराव सामने प्रत्येकी 20 षटकांचे असतील. त्यांना आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा दर्जा नसेल. या सामन्यांत प्रत्येक संघाला सामन्यात आपले सर्व 15 खेळाडू मैदानात उतरवता येतील.
सराव सामन्यादरम्यान कोणत्याही गटातील कोणतेही दोन संघ आमनेसामने येणार नाहीत. भारताला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसह अ गटात स्थान देण्यात आले आहे. ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड आणि बांगलादेशला स्थान मिळाले आहे. बांगलादेशातील सध्याची राजकीय अस्थिरता लक्षात घेता 3 ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही स्पर्धा यूएईला हलवण्यात आली आहे.
सराव सामन्यांचे वेळापत्रक
28 सप्टेंबर, पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलंड
28 सप्टेंबर, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
29 सप्टेंबर, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
29 सप्टेंबर, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
29 सप्टेंबर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
30 सप्टेंबर, श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड
30 सप्टेंबर, बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान
1 ऑक्टोबर, वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
1 ऑक्टोबर, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
1 ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन
राखीव खेळाडू – उमा छेत्री, तनुजा कंवर आणि सायमा ठाकोर
हेही वाचा-
पहिल्यांदाच टी20 विश्वचषक खेळणार ‘या’ भारतीय क्रिकेटपटू, डब्लूपीएलमध्ये केलंय शानदार प्रदर्शन
अविश्वसनीय! 137 चेंडू खेळूनही उघडले नाही खाते, इंग्लंडच्या फलंदाजाची खेळी ठरली चर्चेचा विषय
घटस्फोटानंतर नताशाने सांगितला प्रेमाचा अर्थ; म्हणाली, “प्रेम कधी अपमान करत…”