---Advertisement---

लंकादहन करण्यासाठी ‘यंग ब्लू आर्मी’ होतेय सज्ज, बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ

On: शुक्रवार, जून 25, 2021 3:13 PM
---Advertisement---

येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू मुंबईच्या एका हॉटेलमध्ये विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करत आहेत.

संघातील वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अशातच बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये युवा खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. (Indian team young brigade is working hard to win series against srilanka)

बीसीसीआयने शुक्रवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संघातील युवा खेळाडू आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत. तसेच या खेळाडूंना एकत्र येऊन सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे खेळाडू जिम सेशनमध्ये घाम गाळताना दिसून येत आहेत.

ही मालिका १३ जुलै ते २५ जुलैदरम्यान खेळली जाणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या संघाचे नेतृत्वपद शिखर धवनला देण्यात आले आहे. तर भुवनेश्वर कुमारला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. रवी शास्त्रींच्या अनुपस्थितीत राहुल द्रविड या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवतील.

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज : ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग

असे असेल भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक

वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १३ जुलै
२) दुसरा वनडे सामना – १६ जुलै
३) तिसरा वनडे सामना – १८ जुलै

टी-२० मालिका
१) पहिला टी-२० सामना – २१ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २२ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २५ जुलै

महत्वाच्या  बातम्या –

‘या’ क्रिकेटपटूंचा छंदच न्यारा, आकर्षक मिशीमुळे राहतात चर्चेत; एकाने तर मिशीचा काढलाय विमा

‘देव आपल्याला वाचवणार नाही म्हणत,’ धोनीने खेळाडूंना केले प्रोत्साहित; मग काय भारत बनला चॅम्पियन

इंग्लंडविरुद्ध गिलऐवजी अग्रवालला देण्यात यावी संधी, ‘ही’ आहेत त्यामागची प्रमुख कारणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---