येत्या विश्व कसोटी अजिंक्यपदस्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय कसोटी संघ इंग्लंडला गेला आहे. असे असताना, मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाचा श्रीलंका दौरा जुलैदरम्यान होणार आहे. या श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचे कर्णधारपद शिखर धवनच्या हाती आहे, तर राहुल द्रविड प्रशिक्षक आहे. आता पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड कोणाला संधी देतात हे पाहण्यास भारतीय चाहते उत्सुक झालेत. तरी, एक नजर टाकूयात भारतीय संघ या श्रीलंका दौऱ्यात अंतिम ११ जणांच्या संघात कोणाला संधी देऊ शकतो.
श्रीलंका विरुद्ध भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि ३ टी -२० सामने खेळणार आहे. गेल्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा झाली असून त्यामध्ये २० खेळाडूंना निवडण्यात आले आहे. ज्यामध्ये अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थिती अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
सलामी जोडी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ
श्रीलंका विरुद्ध धवन आणि पृथ्वी शॉ हे दोन फलंदाज सलामीला उतरण्याची दाट शक्यता आहे. तरी, संघात सलामीसाठी देवदत्त पडीकल आणि ऋतुराज गायकवाड हे सुद्धा पर्याय आहेत. पण शॉचा अनुभव आणि फॉर्म पाहाता, त्यालाच आधी पंसती दिली जाऊ शकते. त्याचबरोबर शिखर कर्णधार असल्याने तो खेळणार हे निश्चित आहे.
मधल्या फळीतील फलंदाज
फलंदाजीत सर्वात महत्वाचं म्हणजे मधली फळी मजबूत असणे. प्रमुख खेळाडू इंग्लंडला गेल्या कारणाने आता श्रीलंकाविरुद्ध संघात कोण असेल मधल्या फळतील याच धवन आणि द्रविडकडे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, गेल्या इंग्लंड विरुद्ध टी-२० सामन्यात पदार्पण करून उत्कृष्ट कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव ३ नंबरवर फलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे. तसेच यष्टीरक्षक संजू सॅमसन ४ नंबरवर असेल आणि त्यानंतर ५ नंबरवर मनीष पांडेला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळ जवळ हे निश्चित आहे की या खेळाडूंनाच संधी मिळू शकते.
अष्टपैलू कामगिरीची जबाबदारी पंड्या बंधूंवर
भारतीय क्रिकेट साठी गेली २/३ वर्ष अष्टपैलू कामगिरी बजावणारा खेळाडू म्हणजे हार्दिक पंड्या. हार्दिक भारतीय संघासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अष्टपैलूची भूमिका निभावतो. परंतु, सध्या फॉर्ममध्ये नसलेल्या हार्दिकला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. तसेच त्याचा भाऊ कृणाल पंड्या फिरकी गोलंदाजी करतो आणि खालच्या फळीला येऊन फलंदाजीसुद्धा करतो. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात अंतिम ११ मध्ये पंड्या बंधूना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.
गोलंदाजी विभाग
गोलंदाजीचा मुख्यधुरा उपकर्णधार भुवनेश्वर कुमारकडे असेल. तसेच त्याला साथ देतील ते म्हणजे नवदीप सैनी आणि दीपक चाहर. आणि फिरकी गोलंदाजीमध्ये वरूण चक्रवर्ती किंवा कुलदीप यादव या दोघांपैकी एकाला संधी मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
क्षणभर विश्रांती! श्रीलंका दौऱ्याआधी हार्दिक पंड्या घेतोय कौटुंबिक सहलीची मजा, पाहा फोटो
बेन स्टोक्स- हेडिंग्ले ते रिषभ पंत- गाबा! वाचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम खेळींच्या आठवणी
धोनी चित्रपटाची तयारी करताना सुशांतची फ्रक्चर झाली होती २ बोटं, कोच हातात काठी घेऊन…