---Advertisement---

विराटनंतर ‘असा’ असेल भारताचा नवीन कसोटी कर्णधार; बीसीसीआय अध्यक्षांशी दिली माहिती

kohli-sa
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (bcci) अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली (sourav ganguly) यांच्यावर अलिकडच्या काही दिवसांमध्ये संघाच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे आरोप केले गेले. गांगुलींना या आरोपांवर स्पष्टकरण देत, त्या आरोपांना कसलाही आधार नसल्याचे सांगितले आहे. पीटीआयसोबत बोलताना गांगुलींना इतरही मुद्यांवर प्रश्न विचारले गेले. यावेळी गंगुलींनी भारताच्या कसोटी संघाच्या नवीन कर्णधाराविषयी महत्वाचे संकेत दिले आहेत.

दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेत १-२ असा पराभव झाल्यानंतर विराट कोहली कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संघाचा नवीन कसोटी कर्णधार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नावर गांगुली म्हाणाले की, “निश्चितच कर्णधारपदासाठी काही निकष आहेत. जो कोणी यामध्ये फिट बसेल, तो पुढचा कसोटी कर्णधार असेल. मला वाटते की, निवडकर्त्यांच्या डोक्यात एक नाव असेल. ते अधिकारी, अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत चर्चा करतील आणि येत्या काळात याची घोषणा केली जाईल.”

काही दिवसांपासून बीसीसीआय अध्यक्षांवर संघाच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे आरोप केले जात आहेत. याविषयी गांगुली म्हणाले की, “मला नाही वाटत की, मी यावर कोणाला उत्तर देण्याची गरज आहे आणि या आधारहीन आरोपांपैकी कशाला महत्व देण्याची गरज आहे. मी बीसीसीआय अध्यक्ष आहे आणि बीसीसीआय अध्यक्षाने जे काम केले पाहिजे तेच करत आहे. हे देखील स्पष्ट करतो की, मी सोशल मीडियावर एक फोटो पाहिला, ज्यामध्ये मी निवड समितीच्या बैठकीत बसल्याचे दाखवले जात आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की, हा फोटो निवड समितीच्या बैठकीतील नव्हता. जयेश जॉर्ज निवड समितीचा भाग नाहीत.”

दरम्यान, विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्यापूर्वी मर्यादित षटकांतील संघाचे कर्णधारपदही सोडले होते. रोहित शर्मा सध्या भारताच्या मर्यादित षटकांतील संघाचा कर्णधार आहे. आता कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठीही रोहितची दावेदार सर्वात भक्कम सांगितली जात आहे. असे असले तरी केएल राहुल, रिषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन या खेळाडूंची नावेही कसोटी कर्णधारपदासाठी चर्चेत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

भारत ऐतिहासिक १०००वा वनडे खेळण्यास सज्ज, पण यापूर्वीच्या ९९९ सामन्यांमध्ये कशी राहिलीय कामगिरी? वाचा

खाकीच्या भीतीने ‘त्याची’ अशी काही टरकली की, पठ्ठ्याने भारतात येण्याचेच बंद केलं

कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लागणं रोहितला वाटतंय अशक्य; म्हणे, ‘सध्यातरी त्याबद्दल विसरून जा’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---