भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानलं जातं. या खेळात जेवढे पैसे भारतीय खेळाडू कमवतात. तेवढी रक्कम जगातील दुसरा कोणताही बोर्ड त्यांच्या खेळाडूला देत नाही. आर्थिक स्थिती जरी भारतीय खेळाडूंची विदेशी खेळाडूंपेक्षा चांगली असली, तरी पंचांची अवस्था आजही खराबच आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये देशांतर्गत असलेल्या पंचांना एका सामन्यासाठी २५०० रुपये मिळतात. आणि कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) काळात या पंचांची अवस्था खूप वाईट झाली आहे. त्यामुळे त्यांना घर चालवणेही कठीण झाले आहे.
यामध्ये मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील देशांतर्गत पंच शमीम दाद (Shamim Dad) यांचंही नाव यामध्ये सामील आहे. जे सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करत आहेत. त्यांनी आपल्या आजारी मुलाच्या उपचारासाठी त्याचे घर, दागिने व सर्व वस्तू विकल्या आहेत. परंतु असे असूनही, जेव्हा त्यांच्याकडे पैशांची कमतरता होती, तेव्हा पंच व स्कोरर पॅनेलने मिळून सुमारे २ लाख रुपये गोळा केले. आणि पंच शमीम दाद यांना मदत करून एक माणुसकीचं उदाहरण जगासमोर ठेवलं.
महत्वाचं म्हणजे, लॉकडाऊन होण्यापूर्वी पंच शमीम यांनी काही कर्ज घेऊन क्रिकेटशी संबंधित वस्तू विकण्यासाठी दुकान चालू केले होते. परंतु लॉकडाऊनमुळे विक्री झाली नाही. आणि त्यामुळे उत्पन्न मिळाले नाही. दरम्यान कोणतेही सामने होत नव्हते. त्याचवेळी त्यांचा मुलगाही गंभीर आजारामुळे अस्वस्थ झाला. हे आर्थिक संकट टाळण्यासाठी शमीम यांना सर्व काही विकावं लागलं.
ते म्हणाले, “माझे घर व सर्व दागिने विकले आहेत. आता विकण्यासाठी फक्त दोन दुचाकी शिल्लक आहेत. वाईट काळात पंच स्कोरर्स असोसिएशनचे रमेश कुशवाह देव म्हणून धावून आले. त्यांच्या पुढाकाराने राज्यातील पंच आणि धावपटूंनी एका तासामध्ये सुमारे दोन लाख रुपये गोळा केले. हे एक उदाहरण आहे. सध्या नागपूर रुग्णालयात मुलावर उपचार सुरू आहेत.”
पंच शमीम यांना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच नितीन मेनन (Nitin Menan) यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त बांगलादेश क्रिकेट बोर्डाबरोबर क्युरेटर म्हणून कार्यरत असणारे बॉबी (Bobby) यांनीही मदत केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जेव्हा वाजपेयी हसत म्हणाले, मग आपण पाकिस्तानमध्ये निवडणुकाही सहज जिंकू!
-धक्कादायक! १९ वर्षांखालील महिला क्रिकेटपटूने केली आत्महत्या
मोठी बातमी: ७ वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत या संघाकडून पुनरागमन करण्यास सज्ज