बुधवारी (२ फेब्रुवारी ) वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) सुरू असलेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय १९ वर्षाखालील संघ आणि ऑस्ट्रेलिया १९ (Indian under 19 team vs Australia under 19 team) वर्षाखालील संघ आमने सामने होते. या निर्णायक सामन्यात भारतीय १९ वर्षाखालील संघाने अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया १९ वर्षाखालील संघाला ९६ धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात धडक दिली आहे. यासह भारतीय संघाच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करताच भारतीय संघाच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय संघ आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलग चौथ्यांदा प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही संघाला असा कारनामा करता आला नाहीये. भारतीय १९ वर्षाखालील संघाने पहिल्यांदा २००० साली अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
त्यानंतर २००६ , २००८ आणि २०१२ मध्ये देखील भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु आता २०१६, २०१८, २०२० आणि २०२२ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश करत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा चौकार मारला आहे. असा कारनामा करणारा भारतीय संघ एकमेव संघ आहे. इतर कुठल्याही संघाला सलग २ वेळेसही अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाहीये.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०१६
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०१६ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. ईशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा डाव अवघ्या १४५ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०१८
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०१८ स्पर्धेत पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने जेतेपदावर आपले नाव कोरले होते. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२०
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२० स्पर्धेत प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला ३ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात बांगलादेश संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते.
महत्वाच्या बातम्या:
U19 वर्ल्डकप: ‘यंग इंडिया’चा ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय; सलग चौथ्यांदा केला अंतिम फेरीत प्रवेश
भारत दौऱ्यानंतर श्रीलंकेचा ‘हा’ गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा, नावे आहेत २८५ विकेट्स
कडक! आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनपूर्वी ‘थाला’ने घेतली ‘अपिरिचित’ची भेट; फोटो भन्नाट व्हायरल