---Advertisement---

एमएस धोनी-रिषभ पंतचे हे फोटो होत आहेत जोरदार व्हायरल!

On: शनिवार, ऑक्टोबर 26, 2019 5:10 PM
---Advertisement---

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा वारसदार म्हणून सध्या युवा यष्टीरक्षक रिषभ पंतकडे पाहिले जात आहे. रिषभही धोनीकडून अनेकदा सल्ले घेत असल्याचे दिसले आहे. नुकतेच रिषभने धोनीबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत. हे फोटो धोनीच्या फार्म हाऊसवरील असल्याचे दिसून येत आहेत. तसेच त्यामध्ये रिषभ धोनी बरोबर चर्चा करतानाही दिसत आहे. त्याचबरोबर धोनीच्या पाळीव कुत्र्यांबरोबरही रिषभ खेळताना दिसत आहे.

रिषभने हे फोटो शेअर करताना ‘गुड वाईब्स ओन्ली’ असे कॅप्शन दिले आहे.

धोनीने सध्या मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. तो भारताकडून शेवटचे 2019 विश्वचषकात जूलैमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात खेळला होता.

तसेच यापूढे आता रिषभच भारतीय संघासाठी यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असणार असल्याचे भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

https://www.instagram.com/p/B4B7UlQgour/?utm_source=ig_embed

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---