सध्या सुरू असलेल्या कॉमवेल्थ गेम्स स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन महिला संघ या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे त्याचा पूर्ण फायदा घेत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इतर खेळ खेळणारे एथलीट्स यांची याठिकाणी भेट घडवून आणली गेली. यावेळी महिला संघातील खेळाडूंनी इतर खेळाडूंना मार्गदर्शनही केले.
कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) इंग्लंडमधील एकूण पाच शहरांमध्ये खेळलवले जात आहेत. या पाच शहरांपैकी एक लंडन आहे, तर भारतीय क्रिकेट संघ बर्मिंघमध्ये आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एथलीट्सची संख्या खूप जास्त आहे आणि व्यस्त वेळापत्रकामुळे सर्व खेळाडूंची एकमेकांशी भेटही होत नाही.
क्रिकेट असा खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडूंना दबाव झेलण्याची सवय असते. अया पार्श्वभूमीवर महिला क्रिकेटपटूंनी कॉमवनेल्थमध्ये सहभागी होणाऱ्या इतर खेळाडूंसोबत खेळताना येणाऱ्या दबावाविषयी खास चर्चा केला. महिला क्रिकेट संघाची भेट याठिकाणी पुरुष आणि महिला हॉकी संघ, तसेच इतर काही खेळाडूंशी झाली. रात्रीच्या वेळी झालेल्या या कार्यक्रमात हॉकी संघाचे कर्णधार आणि क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांचे स्वागत केले गेले.
भारतीय महिला संघ या स्पर्धेतील उपांच्य सामन्यापर्यंत पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारताने ४ धावांनी विजय मिळवला. तत्पूर्वी मिळालेल्या मोकळ्या वेळेचा त्यांनी योग्य उपयोग करून घेतला. श्रीजेश पीआर आणि मनप्रीत सिंग यांच्याशी चर्चा करण्यासोबतच खेळाडूंनी टेबल टेनिसचा आनंदही घेतला. त्याव्यतिरिक्त मुरली श्रीशंक याच्या लाईव्ह सामन्याचाही आनंद घेतला. टीव्हीवर सामना पाहताना त्यांनी श्रीशंकरला प्रोत्साहन देण्याचे काम केले. श्रीशंकरने लांब उडी स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक पटकावले आणि अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
This table at the #B2022 Athletes Village dining hall truly embodies the essence of a ????????????????????-???????????????????? ????????????????t????#TeamIndia sprinter @HimaDas8 joined @TheHockeyIndia and @BCCIWomen players and Janneke Schopman, the head coach of the women's hockey team, at dinner ????????????️ pic.twitter.com/7Buz4emm2r
— Team India (@WeAreTeamIndia) August 5, 2022
महिला हॉकी संघातील खेळाडूंसोबत क्रिकेटपटूंनी डान्स देखील केला. महिला क्रिकेटव्यतिर्कित महिला हॉकी संघही उपांत्य सामन्यात पोहोचला होता. मात्र शुक्रवारी खेळल्या गेलेल्या हॉकीच्या या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांना मात दिला. आता कांस्य पदकासाठी त्यांचा सामना न्यूझीलंडसोबत होईल. भारताच्या पुरुष हॉकी संघाला शनिवारी रात्री उपांत्य सामना खेळायचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकाच्या तयारीवरून दिनेश कार्तिकचे बडे बोल! म्हणाला, ‘भारताला…’
इंग्लंडला बगल देत टीम इंडियाने गाठली फायनल! स्म्रीतीचे अर्धशतक तर गोलंदाजीत ‘या’ खेळाडूने दाखवले कसब






