मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशची महिला क्रिकेटपटू अंशुला राव ही उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळून आली आहे. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य समितीने (नाडा) ही चाचणी घेतली होती. यासह, अंशुला ही उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.
नाडाने घेतली होती चाचणी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नाडाच्या अखत्यारित आल्यानंतर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. बीसीसीआय मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात नाडाशी संलग्न झाली होती. जून २०२० मध्ये युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेला. त्यापूर्वी देखील प्रदीप सांगवान व भारताच्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य यूसुफ पठाण हे देखील अशा प्रकारच्या कारवाईत सहभागी झाल्याची माहिती पुढे आली होती. नाडापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंचे नमुने स्वीडनस्थित इंटरनॅशनल डोपिंग टेस्ट अँड मॅनेजमेंट घेत असत.
मार्च महिन्यात घेतला होता नमुना
नाडाने या वर्षी मार्च महिन्यात अंशुला हिची उत्तेजक द्रव्य चाचणी घेतली होती. तिच्या नमुन्यात १९- नोरान्ड्रॉस्टेरॉन हे प्रतिबंधित स्टेरॉईड आढळले आहे. जे एनाबोलिक-एंड्रोजेनिक (AAS) हार्मोनला प्रभावित करते. तिच्या या नमुन्यांची चाचणी दोहास्थित लॅबोरेटरीमध्ये केली गेली. अंशुला ही आपल्या ब चाचणीसाठी अपील करु शकते. अंशुलावर या प्रकरणात २-४ महिन्यांचा प्रतिबंध लागू शकतो. कारण, ती प्रथमच या चाचणीमध्ये दोषी आढळली आहे.
केले आहे भारताचे प्रतिनिधित्व
अंशुला राव ही मध्य प्रदेशची वरिष्ठ महिला खेळाडू मानली जाते. उजव्या हाताची फलंदाज असलेली अंशुला ही मध्यमगती गोलंदाजीदेखील करू शकते. तसेच तिने भारताच्या २३ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
कसोटी क्रिकेटमध्ये विराट ऐवजी हा खेळाडू आहे सरस कर्णधार, बदलू शकतो भारतीय संघाचे नशीब
ठरलं एकदाचे, टी २० विश्वचषक युएईत होणार! बीसीसीआय अध्यक्षांनी दिला दुजोरा
अर्धशतकानंतर ‘अशाप्रकारे’ मिताली राजला बाद होताना पाहून क्रिकेटप्रेमीही आश्चर्यचकित, व्हिडिओ व्हायरल