---Advertisement---

वरिष्ठ भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणतेय, “आम्ही वुमेन्स आयपीएलबाबत आशावादी”

On: शुक्रवार, डिसेंबर 10, 2021 10:10 PM
womens-ipl
---Advertisement---

भारतात महिला क्रिकटेचे महत्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने मागच्या काही वर्षात जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताता अनेकदा महिलांसाठी वेगळी आयपीएल आयोजित करण्याविषयी चर्चा होत असते. मात्र, याबाबत बीसीसीआयने अद्याप कसलेच ठोस पाऊल उचलेले नाही. अशात भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू पूनम राऊत (punam raut) हिने आयपीएलविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या मते भारतातील महिला क्रिकेटचे दिवस २०१७ विश्वचषकानंतर बदलले.

पूनमने एका वृत्तसंस्थेशी सोबत भारतातील महिला क्रिकेटच्या स्थितीविषयी चर्चा केली. यावेळी ती म्हणाली की, “आम्ही इंग्लंडमध्ये २०१७ विश्वचषकात खूप चांगले प्रदर्शन केले आणि तेव्हापासून भारतीय महिला क्रिकेटसाठी गोष्टी बदलू लागल्या. आमच्या सामन्यांचे प्रसारण सुरू झाले आणि चांगली मीडिया कवरेज मिळू लागली. आई-वडील देखील क्रिकेट खेळणाऱ्या मुलींना पुढे करू लागले. अगोदर आई-वडीलांची तक्रार असायची. मात्र, आता मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित करतात. अनेक लोक माझ्याकडे महिला क्रिकेटमधील वेगवेगळ्या टप्प्यांविषयी आणि संपूर्ण निवडप्रक्रियेविषयी विचारपूस करतात. एकंदरीत पाहता समाज बदलला आहे. अधिक महिला क्रिकेट खेळत आहेत.”

पूनमच्या मते त्यांच्या वेळेपेक्षा आताची परिस्थिती खूप चांगली आहे आणि महिला क्रिकेट खेळू शकतात. “अनेक ठिकाणी चांगली सुधार केले गेले आहेत. जेव्हा मी खेळायला सुरुवात केली, तेव्हा आमच्या सामन्यांचे नियमित प्रसारण होत नसायचे. लोकांना केवळ एक दोन महिला क्रिकेटपटूंविषयी माहिती होती. आता चाहते भारतीय महिला क्रिकेटचे सामने पाहतात आणि सर्वांना ओळखतात,” असे ती म्हणाली.

भारतात महिला आयपीएलच्या आयोजनाविषयी पूनमने महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ती याबाबात म्हणाली की, “होय, मी महिला आयपीएलविषयी खूप आशावादी आहे. लीग भारतीय महिला क्रिकेट संघाला निडर आणि नवीन खेळाडू प्राप्त करून देण्यासाठी मदत करेल, जसे आपण पुरुष संघासोबत पाहतो. युवा खेळाडूंना दिग्गजांसोबत खांद्याला खांदा लावून चालण्याची संधी मिळेल. हा त्या खेळाडूंसाठी एक मंच असेल, ज्यांना भारतीय संघातून बाहेर केले गेले आहे, जेणेकरून ते स्वतःला सिद्ध करू शकतील.”

महत्वाच्या बातम्या –

तब्बल ११५६ गडी बाद करणारे ‘दिग्गज’ अँडरसन-ब्रॉड बनलेत ‘वॉटर बॉय’! सोशल मीडियात होतेय तुफान कौतुक

रोहित घेणार विराटपेक्षा अधिक वेतन? चर्चेला आला ऊत

ओमिक्रॉनच्या सावटाखाली ‘इतके’ दिवस ‘टीम इंडिया’ राहणार दक्षिण आफ्रिकेत; ‘या’ दिवशी होणार रवाना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---