---Advertisement---

नादच खुळा! १७ वर्षीय शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक; केली भारताकडून तिसर्‍या वेगवान टी२० अर्धशतकाची नोंद

---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसर्‍या टी२० सामन्यात तुफानी खेळी केली. पहिले दोन सामने पराभूत होऊन मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात 9 गडी राखून विजय मिळवला आणि व्हाईटवॉश टाळला. टी२० क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या शेफालीने  भारताकडून वेगवान अर्धशतक झळकावून खास विक्रमाची नोंद केली आहे.

तिसर्‍या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर 20 षटकांत 7 विकेट्स गमावून केवळ 112 धावा करू शकला. यामध्ये राजेश्वरी गायकवाडने 4 षटकात केवळ 9 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. याशिवाय अनुराधा रेड्डी, राधा यादव, दीप्ती शर्मा आणि सिमरन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक
भारतीय सलामीवीर शेफाली वर्माने पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त शैलीत गोलंदाजांचे चेंडू सीमारेषापार पाठवले. अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या या शेफालीचे हे तिसरे वेगवान भारतीय अर्धशतक आहे. याअगोदर भारतासाठी टी20 सामन्यात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाच्या नावावर आहे. स्मृतीने सन 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 25 चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावले होते. यानंतर स्मृतीनेच सन 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक साकारले होते.

या सामन्यात 113 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली शेफाली आणि मंधानी यांनी भारताला तूफानी सुरूवात करून दिली. या सलामी जोडीच्या सुरुवातीच्या बळावर अवघ्या 11 षटकांत भारताने 9 विकेट्स राखून सामना जिंकला. शेफाली 60 धावाकरून बाद झाली, तर मंधाना 28 चेंडूत नाबाद 48 धावा करून परतली.

महत्त्वाच्या बातम्या-

-त्यावेळी किरण मोरेंनी पैश्यांना प्राधान्य दिले असते तर आज कृणाल-हार्दिक टीममध्ये दिसले नसते

-मिशेल स्टार्कने केला मोठा खुलासा; ‘या’ कारनामुळे घेतला आयपीएल २०२१ हंगामात न खेळण्याचा निर्णय

-भारतीय संघाबरोबरच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; ‘इतक्या’ दिवस श्रेयस अय्यर राहू शकतो क्रिकेटपासून दूर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---