---Advertisement---

INDW vs RSAW कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतानं ठोकल्या 525 धावा

On: शुक्रवार, जून 28, 2024 6:57 PM
INDW vs RSAW
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका महिलांचा भारत (South Africa Tour India) दौरा सुरु आहे. पहिल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने मात दिली होती. परंतू आजपासून शुक्रवार (28 जून) रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 5 दिवसांच्या एकाच कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर हा सामना रंगला होता. त्यामध्ये पहिला दिवस संपला. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतानं 4 विकेट्स गमावून 525 धावा ठोकल्या आहेत.

भारतीय महिलांनी कसोटीच्या पहिल्याच सामन्यात 525 धावा केल्या आहेत. ज्या आतापर्यंत महिला कसोटी सामन्यात पहिल्या डावातील सर्वाधिक धावा आहेत. 525 धावांच्या खेळीत भारताकडून सलामीवीर शफाली वर्मा (Shafali Verma) आणि उपकर्णधार स्म्रीती मानधनान (Smriti Mandhana) शतकी खेळी केली. शफाली वर्मानं 197 चेंडूत 205 धावा ठोकून इतिहास रचला. महिला कसोटी सामन्यात जलद द्विशतक ठोकणारी शफाली जगातील पहिली महिला ठरली.

जेमिमाह राॅड्रिग्जनं (Jemimah Rodrigues) 94 चेंडूत 55 धावांची खेळी खेळली. त्यामध्ये तिनं 8 चौकार लगावले. तर कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) 76 चेंडूत 42 धावा ठोकून नाबाद आहे आणि यष्टीरक्षक रिचा घोष (Richa Ghosh) 33 चेंडूत 43 धावांच्या खेळीसह नाबाद आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी डेल्मी टुकरनं 2 आणि नादिन डी क्लर्कनं 1 विकेट घेतली. उद्या शनिवार (29 जून) रोजी सकाळी 9:30 वाजता कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सामन्यानंतर रोहित शर्मानं दिला पत्नी रितिका सजदेहला फ्लाइंग किस, पहा व्हिडिओ
शफाली वर्मानं रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावलं वेगवान द्विशतक
इंग्लंडच्या पराभवानंतर माजी कर्णधारचा गंभीर अरोप, हरभजन सिंगने दिले सडेतोड उत्तर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---