भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. या दौर्यात हा संघ इंग्लंडशी एक कसोटी सामना, तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील एक कसोटी सामना पार पडला असून वनडे सामन्यांना रविवार (२७ जून) पासून सुरुवात होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघ कठोर सराव करतांना दिसून आला.
फिल्डिंगवर घेतली कठोर मेहनत
भारतीय महिला संघाला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडशी दोन हात करायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील मालिकेत पराभव पत्करावा लागल्याने या मालिकेत पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. याच कारणासाठी सामन्याच्या आधी भारतीय संघ जोरदार सराव करतांना दिसून आला. या सराव सत्रात विशेषकरून फिल्डिंगवर खास मेहनत घेण्यात आली. संघाचे फिल्डिंग प्रशिक्षक अभय शर्मा यांच्या निगराणीखाली हे सत्र पार पडले.
अभय शर्मा यांनी फिल्डिंगचे काही महत्वाचे अंग या सत्रात खेळाडूंकडून घोटून घेतले. तसेच खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्यातच दोन गट पाडून छोटीशी स्पर्धा देखील खेळवली. सराव चुरशीचा व्हावा, म्हणून यातील विजेत्याला २० पाउंडसचे बक्षीस देखील देण्यात येणार असल्याचे प्रशिक्षक अभय शर्मा यांनी खेळाडूंना सांगितले. त्यामुळे खेळाडूंनी झेल पकडण्याचा आणि स्टंपवर चेंडू मारण्याचा गांभीर्याने सराव केल्याचे यावेळी दिसून आले. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी समान कामगिरी केल्याने कोणीच विजयी ठरले नाही. बीसीसीआय महिलांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या सरावाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
As #TeamIndia gets ready for the first WODI in Bristol, the area of focus has been fielding ???? under coach Abhay Sharma ????
In the winner takes it all contest, find out who won? ????????#ENGvIND pic.twitter.com/ndLtRtXrg2
— BCCI Women (@BCCIWomen) June 26, 2021
एकमेव कसोटी झाली ड्रॉ
दरम्यान, इंग्लंड दौर्यावर खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना ड्रॉ करण्यात भारतीय महिला संघाने यश मिळवले होते. ब्रिस्टॉल येथे खेळवल्या गेलेल्या या सामन्यात एकवेळ त्यांच्यावर फॉलोऑनची देखील नामुष्की ओढवली होती. मात्र दुसर्या डावात झुंजार खेळ करत त्यांनी सामना ड्रॉ केला. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून आगामी वनडे मालिकेसाठी त्यांना याचा फायदा होईल.
महत्त्वाच्या बातम्या:
टी२० विश्वचषक आयोजनाबाबत बीसीसीआय सचिवांचे महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले…
WTC फायनलमधील एकमेव खेळाडू ज्याला एक धाव, एक बळी आणि एक झेलदेखील घेण्यात आले अपयश






