डर्बी| इंग्लंड विरुद्ध भारत महिला संघात मंगळवारी (13 सप्टेंबर) झालेला दुसरा टी20 सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. प्रथम गोलंदाजीत स्नेह राणा आणि नंतर फलंदाजीत स्म्रीती मंधाना हिने जबरदस्त प्रदर्शन करत संघाला 8 विकेट्सने सामना जिंकून दिला. यासह भारतीय संघाने 3 सामन्यांची टी20 मालिका 1-1 ने बरोबरीत आणली आहे.
या सामन्यात (Second T20I) प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ निर्धारित 20 षटकाच 6 बाद 142 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाने 16.4 षटकातच 2 विकेट्स गमावत इंग्लंडचे लक्ष्य गाठले आणि दिमाखात विजय मिळवला.
स्म्रीती मंधानाचा झंझावात
इंग्लंडच्या 143 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने प्रभावी खेळी केली. तिने 53 चेंडू खेळताना 149 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. 13 चौकारांच्या मदतीने तिने नाबाद 79 धावा केल्या. तिच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघ इंग्लंडचे आव्हान सहजरित्या पार करू शकला. स्म्रीतीला तिच्या या दमदार खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्म्रीतीबरोबरच शेफाली वर्माने 20 आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने 29 धावा जोडल्या.
या डावात इंग्लंडकडून फ्रेया डेविस आणि सोफी एक्लेस्टोन यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.
https://twitter.com/BCCIWomen/status/1569779306154557441?s=20&t=x_H_KBn4C_6Wb2tHw2fYzQ
स्नेह राणाचा भेदक मारा
तत्पूर्वी भारताच्या गोलंदाजांपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली होती. इंग्लंडच्या वरच्या फळीतील सर्व फलंदाज एकेरी धावेवर बाद झाल्या होत्या. मात्र त्यांचे शेपूट वळवळले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फ्रेया कँप हिने अर्धशतक केले. 37 चेंडूत 3 षटकार आणि चौकारांच्या मदतीने तिने नाबाद 51 धावा केल्या. परंतु या खेळीचा उपयोग झाला नाही.
या डावात भारताकडून स्नेह राणा (Sneh Rana) हिने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. 4 षटके फलंदाजी करताना 24 धावा देत तिने या विकेट्स घेतल्या. तसेच रेणुका सिंग आणि दिप्ती शर्मा यांनाही 1 विकेट घेण्यात यश आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियात जागा, आता बनलाय हुकुमी एक्का; वाचा सूर्यकुमारच्या संघर्षाची कहाणी
“हार्दिक वर्ल्डकपमध्ये रवी शास्त्रींसारखा पराक्रम करेल”; भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी
पुन्हा एकदा वर्ल्डकप गाजवायला नामीबियाचा संघ जाहीर; आरसीबीसाठी खेळलेला अष्टपैलूही संघात






