भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विनेशनं आरोप केला आहे की, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष संजय सिंग तिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळण्यापासून रोखू इच्छित आहेत. विनेशलाही तिच्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाण्याचीही भीती आहे. विनेशच्य मते सामन्यादरम्यान तिला पाण्यात काहीतरी मिसळून प्यायला लावलं जाईल. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान खेळलं जाणार आहे.
29 वर्षीय विनेश फोगटनं 2019 आणि 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 53 किलोमध्ये कांस्यपदक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत (2018) 50 किलोमध्ये सुवर्णपदक जिंकल आहे. पुढील आठवड्यात किर्गिस्तानमधील बिश्केक येथे होणाऱ्या आशियाई पात्रता स्पर्धेद्वारे विनेशला 50 किलो वजनी गटात ऑलिम्पिक कोटा गाठायचा आहे.
नुकत्याच पटियाला येथे झालेल्या निवड चाचणीत 50 किलो व्यतिरिक्त विनेशनं 53 किलो वजनी गटातही भाग घेतला होता. 53 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तिचा पराभव झाला. मात्र 50 किलो वजनी गटात विजय मिळवल्यामुळे विनेशला आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी प्रवेश मिळाला. तिनं 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत शिवानीचा पराभव केला.
विनेशनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका लांबलचक पोस्टमध्ये लिहिलं की, “ब्रिजभूषण आणि त्यांनी ठेवलेले डमी संजय सिंग मला ऑलिम्पिकमध्ये खेळण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत आहेत. नियुक्त केलेले प्रशिक्षक ब्रिजभूषण आणि त्यांच्या टीमचे आवडते आहेत. त्यामुळे माझ्या सामन्यादरम्यान ते माझ्या पाण्यात काहीतरी मिसळून मला प्यायला लावतील हे नाकारता येणार नाही.”
ती पुढे म्हणाली की, “आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. एक महिन्यापासून मी भारत सरकारला (SAI, TOPS) माझ्या प्रशिक्षक आणि फिजिओच्या मान्यतेसाठी विनंती करत आहे. मला डोपिंगमध्ये अडकवण्याचा कट असू शकतो असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आमचा मानसिक छळ करण्यात कोणतीही कसर सोडली जात नाही. एवढ्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी माझ्यावर होणारा असा मानसिक छळ कितपत न्याय्य आहे?”.
विनेश म्हणाली की, ओळखपत्राशिवाय माझे प्रशिक्षक आणि फिजिओ माझ्यासोबत स्पर्धा संकुलात जाऊ शकत नाहीत. वारंवार विनंती करूनही ठोस प्रतिसाद मिळत नाही. कोणीही मदत करायला तयार नाही. अशा खेळाडूंच्या भविष्याशी नेहमीच खेळ केला जाईल का?”
तिनं पुढे लिहिलं की, “आम्ही लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे देशासाठी खेळायला जाण्यापूर्वीच आमच्यासोबत राजकारण होईल का? आपल्या देशात चुकीच्या विरोधात आवाज उठवण्याची हीच शिक्षा आहे का? देशासाठी खेळायला जाण्यापूर्वी आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे.”
19th अप्रैल को एशियन ओलम्पिक क्वालीफाई टूर्नामेंट शुरू होने जा रहा है। मेरे द्वारा लगातार एक महीने से भारत सरकार (SAI,TOPS) सभी से मेरे कोच और फिजियो की ACCREDITATION (मान्यता) के लिए रिक्वेस्ट की जा रही है। ACCREDITATION के बिना मेरे कोच और फिजियो का मेरे साथ कम्पटीशन ARENA में…
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) April 12, 2024
विनेश फोगट ही देशातील तीन अव्वल कुस्तीपटूंपैकी एक आहे जिनं भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आरोप करत त्यांच्या विरोधात आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला मात्र त्यांना स्थानिक कोर्टातून जामीन मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी नतमस्तक झाला, मग मिठी मारली; मोहम्मद सिराजनं जसप्रीत बुमराहचा असा केला सन्मान, पाहा VIDEO
एकाच डावात तिघांची अर्धशतकं अन् तिघे शून्यावर बाद! आरसीबी पराभवातही रेकॉर्ड बनवते
नाव मोठं, लक्षण खोटं! ‘बिग शो’ मॅक्सवेलचा आयपीएलमधील फ्लॉप शो जारीच