---Advertisement---

टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि ट्रेनर बदलणार, बायो-बबलमध्ये झाले नाहीत सहभागी

On: शनिवार, ऑगस्ट 14, 2021 1:02 AM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा आणि ट्रेनर नरेश रामदास यांच्या जागेवर आता नवीन लोकांची नियुक्ती केली जाणार आहे. दोघांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी बायो-बबलमध्ये प्रवेश केला नाही. इंग्लंड दौऱ्यावर अभयच्या कामाची खेळाडूंनी प्रशंसा केली होती. तो राष्टीय क्रिकेट अकादमीच्या सहायक कर्मचाऱ्यांमध्ये सहभागी आहे. त्याने मंगळवारी संध्याकाळी भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला नाही, यामुळे खेळाडूंनाही आश्चर्य वाटले. भारतीचे माजी सलामीवीर फलंदाज शिवसुंदर दास फलंदाजी प्रशिक्षकाच्या जागेवर कार्यरत आहेत. संघाचे मुख्य कोच रमेश पोवार असून ते गोलंदाजी प्रशिक्षकाचे कामही पार पाडतात.

अभय शर्माने खेळाडूंसोबत खूप काम केले आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेदरम्यान टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौरने त्याच्या कामाचे कौतुक केले होते. दरम्यानच्या काळात संघाच्या क्षेत्ररक्षणातही अनेक सुधार पाहायला मिळाले होते. हरलीन देओलने सीमारेषेवर घेतलेला झेल सर्वांना लक्षात आहे. भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजनेही क्षेत्ररक्षणातील सुधारणेसाठी शर्माचे कौतुक केले होते.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीप्रमाने नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि ट्रेनरची नावे लवकरच घोषित केली जातील. इंग्लंड दौऱ्यादरम्यान अभय शर्मा दुसऱ्यांदा भारतीय संघाशी जोडला गेला होता. याआधी मायदेशातील दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने संघासोबत काम केले आहे.

पीटीआयच्या माहितीप्रमाने भारतीय महिला क्रिकेट संघात केवळ मख्य प्रशिक्षकाची स्थायी नियुक्ती आहे. एनसीएचे सहाय्यक कर्मचाऱ्यांना नेहमी बदलले जाते. पुढच्या वर्षी होणाऱ्या 19 वर्षाखालील टी-20 विश्वचषक डोळ्यांसमोर ठेवून शर्माला युवा संघाबरोबर काम करण्याची संधी मिळू शकते. तो यापूर्वी 19 वर्षांखालीलच संघासोबत दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर गेला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

हमीद आला अन् गेला!! पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने ‘अशी’ काढली विकेट, पाहा व्हिडिओ

आहा कडक!! लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंसाठी लंचच्या वेळी होते ‘हे’ खास मेन्यू

पंतचं ऐकलं असतं तर, विराटच्या नावे ‘हा’ नकोसा विक्रम झाला नसता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---