---Advertisement---

हमीद आला अन् गेला!! पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने ‘अशी’ काढली विकेट, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, ऑगस्ट 14, 2021 12:56 AM
---Advertisement---

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यातील सुरुवातीच्या दोन्ही दिवशी भारतीय खेळाडूंनी इंग्लंडच्या खेळाडूंना बॅकफूटवर टाकले आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ३६४ धावांवर संपुष्टात आल्यानंतर,भारतीय गोलंदाजांनी देखील जोरदार सुरुवात करून दिली.

भारतीय संघाने केलेल्या ३६४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाकडून पहिल्या डावात रॉरी बर्न्स आणि डोम सिब्ले यांची जोडी मैदानात आली होती. या दोघांकडून इंग्लंड संघाला चांगली सुरुवात करून देण्याची अपेक्षा होती. परंतु, इंग्लिश फलंदाजांना मोहम्मद सिराजच्या वेगवान गोलंदाजीची तोड शोधून काढता आली नाही.

मोहम्मद सिराजला या खेळपट्टीवरून गती आणि स्विंग दोन्ही मिळत होते. ज्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. त्याने १५ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डोम सिब्लीला केएल राहुलच्या हातून झेलबाद करून माघारी धाडले. त्यानंतर ५ वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या हसीब हमिदला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित करून माघारी धाडले. हा चेंडू पाहून हसीब हमिद देखील आश्चर्यचकीत झाला होता. मोहम्मद सिराजने पहिल्या कसोटी सामन्यात देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने या सामन्यात ३ गडी बाद केले होते.(Mohammad Siraj sent back Haseeb Hameed on the very first ball of his innings,watch video)

भारतीय संघाचा पहिला डाव ३६४ धावांवर संपुष्टात
भारतीय संघातील फलंदाजांनी या सामन्यात देखील अप्रतिम फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली तर, रोहित शर्माने ८३ धावांचे योगदान दिले. तसेच कर्णधार कोहलीला या डावात देखील चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु ऑली रॉबिन्सनने त्याला ४२ धावांवर माघारी धाडले होते. तसेच शेवटी रविंद्र जडेजाने येऊन ४० तर रिषभ पंतने ३७ धावांचे योगदान दिले होते. भारतीय संघाचा संपूर्ण डाव ३६४ धावांवर संपुष्टात आला होता.

रुट-बर्न्सने सावरला इंग्लंडचा डाव 
मोहम्मद सिराजने सलग २ चेंडूत डॉमनिक सिब्ली आणि हसीब हमीद यांना बाद केले. मात्र, यानंतर कर्णधार जो रुट आणि सलामीवीर रॉरी बर्न्स यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली.

मात्र, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यास काही वेळ बाकी असताना मोहम्मद शमीने बर्न्सला ४९ धावांवर बाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ४५ षटकांत ३ बाद ११९ धावा केल्या आहेत, दुसऱ्या दिवसाखेर रुट ४८ धावांवर आणि बेअरस्टो ६ धावांवर नाबाद आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

आहा कडक!! लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंसाठी लंचच्या वेळी होते ‘हे’ खास मेन्यू

पंतचं ऐकलं असतं तर, विराटच्या नावे ‘हा’ नकोसा विक्रम झाला नसता

कर्णधार किंग कोहलीला बाद करण्याच्या ‘मास्टर प्लॅन’बद्दल स्वतः गोलंदाजाने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---