---Advertisement---

टीम इंडियाच्या ‘गर्ल गॅंग’ने धरला ताल; व्हिडिओ सोशल मीडियावर लावतोय आग

On: बुधवार, ऑक्टोबर 20, 2021 5:00 PM
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये महिला बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे.या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पहायला मिळत आहेत. या स्पर्धेत काही भारतीय महिला खेळाडूंनी देखील सहभाग घेतला आहे. दरम्यान मिळालेल्या रिकाम्या वेळात भारतीय महिला खेळाडू मस्ती करताना दिसून आल्या.ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

भारतीय महिला संघातील खेळाडू देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. हे खेळाडू मजेशीर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. असाच एक व्हिडिओ जेमिमा रॉड्रिग्जने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती भारतीय महिला संघातील काही खेळाडूंसोबत परदेशी गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जेमिमा रॉड्रिग्जसह स्मृती मंधाना, पुनम यादव, राधा यादव आणि भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा देखील समावेश आहे. या व्हिडिओमध्ये ते ‘इन द गेट्टो’ या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत आहेत. ज्यावर कॅप्शन म्हणून जेमिमा रॉड्रिग्जने “आमच्या गँगसोबत इन द गेट्टो ट्राय करतेय..” असे लिहिले आहे. हा व्हिडीओ १ लाख लोकांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. हरमनप्रीत कौर पहिल्यांदाच अशा मजेशीर व्हिडिओमध्ये झळकली आहे. तर, मंधानाचा डान्स देखील चाहत्यांना भरपूर आवडतोय.

https://www.instagram.com/reel/CVNIXs9lNBR/?utm_medium=copy_link

जेमिमा रॉड्रिग्जने यावर्षी बिग बॅश लीग स्पर्धेत पदार्पण केले आहे. ती मेलबर्न रेनेगेड्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तर हरमनप्रीत कौर देखील याच संघात खेळतेय. दोघींनी आतापर्यंत एक-एक सामना खेळला आहे. ज्यामध्ये रॉड्रिग्जने सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली होती. तिने ३३ धावांची खेळी केली होती. तर हरमनप्रीत कौरने १९ चेंडूंमध्ये २४ धावांची खेळी केलेली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---