---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची झाली घोषणा

On: शुक्रवार, मे 14, 2021 10:48 PM
india women odi
---Advertisement---

भारताच्या राष्ट्रीय निवड समितीने आज इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या महिला संघाची घोषणा केली. कसोटी, वनडे आणि टी२० मालिकेसाठीच्या संघांचा यात समावेश आहे. कसोटी आणि वनडे संघाचे कर्णधारपद अनुभवी मिताली राजकडे आहे. तर टी२० संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे देण्यात आले आहे.

१६ जूनपासून इंग्लंडमध्ये या मालिकांना सुरुवात होईल. १६ ते १९ जून दरम्यान एकमेव कसोटी सामना खेळवला जाईल. तर तर २७, ३० जून आणि ३ जुलै रोजी अनुक्रमे तीन वनडे सामने खेळवले जातील. तर ९, ११ आणि १५ जुलै रोजी तीन टी२० सामने खेळवले जातील.

कसोटी आणि वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव.

https://twitter.com/BCCIWomen/status/1393249159268814848

टी२० मालिकेसाठीचा भारतीय संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, सिमरन दिल बहाद्दूर.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---