आज (२७ फेब्रुवारी) मेलबर्न (Melbourne) येथे आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) भारतीय महिला संघाचा (Indian Womens Team) तिसरा सामना न्यूझीलंड महिला (New Zealand Womens Team) संघाविरुद्ध पार पडला. हा सामना भारतीय महिला संघाने ४ धावांनी जिंकला.
हा सामना जिंकत भारतीय संघाने विश्वचषकात आपली हॅट्रिक (Hat Trick) पूर्ण केली आहे. तसेच भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाऊल ठेवले आहे. यावेळी भारतीय संघ 3 सामने जिंकत ग्रुप ‘ए’मध्ये 6 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
भारतीय संघाने २००८, २०१० आणि २०१८ नंतर चौथ्यांदा टी२० विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ८ बाद १३३ धावा केल्या.
भारताने दिलेल्या १३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकात ६ बाद १३० धावाच केल्या.
यावेळी न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना अमेलिया केरने (Amelia Kerr) २९ चेंडूत सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. यामध्ये ६ चौकारांचा समावेश होता. तर केटी मार्टिनने (Katey Martin) २५ आणि मैडी ग्रीनने (Maddy Green) २४ धावांची खेळी केली.
भारताकडून गोलंदाजी करताना शिखा पांडे (Shikha Pandey), दीप्ती शर्मा (Deepti Yadav), पूनम यादव (Poonam Yadav), राधा यादव, राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून शेफाली वर्माने (Shafali Verma) ३४ चेंडूत ४६ धावांची उत्कृष्ट खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. तर तानिया भाटियाने (Taniya Bhatia) २३ आणि राधा यादवने (Radha Yadav) १४ धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.
न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना रोजमेरी मेयर (Rosemary Mair) आणि अमेलिया केरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर सोफी डिवाइन (Sophie Devine), ली ताहुहु (Lea Tahuhu) आणि लीग कास्पेरेकने (Leigh Kasperek) प्रत्येकी १ विकेट घेतली.
यापूर्वी झालेल्या आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) पहिल्या 2 सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश महिला संघाविरुद्ध विजय मिळवला होता.
यानंतर भारतीय महिला संघाचा पुढील सामना 29 फेब्रुवारीला जंक्शन ओव्हल, मेलबर्न येथे श्रीलंका महिला संघाविरुद्ध होणार आहे.
टीम इंडियाने चौथ्यांदा केला #iccwomenst20worldcup च्या उपांत्यफेरीत प्रवेश. ७ विश्वचषकात २००९, २०१०, २०१८ आणि २०२० असे चार विश्वचषक टीम इंडिया उपांत्यफेरीत. #म #मराठी pic.twitter.com/lwoikc4zrb
— Maha Sports (@Maha_Sports) February 27, 2020
बुमराहने पुन्हा तेच केलं तर मग मात्र टीम इंडियाचं…
वाचा- ???? https://t.co/7030QuztMh????#म #मराठी #Cricket #TeamIndia @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) February 27, 2020