भारतीय महिला संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यासाठी पोहोचली आहे. मिताली राजच्या निवृत्तीनंतर भारताचा हा पहिला दौरा असणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होण्याअगोदर नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीचे (NCA) प्रमुख आणि भारताचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणची भेट घेतली. या भेटीत त्यांनी नक्कीच आपला ‘गुरुमंत्र’ भारतीय महिला संघाला दिला असावा.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातखाली भारतीय संघ १९ जुनला श्रीलंकेला पोहोचला आहे. भारतीय संघाच्या श्रीलंकेत पोहोचताच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कर्णधार हरमनप्रीत कौर आणि आणखी ४ खेळाडूंचे फोटो आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर टाकला आहे. पहिल्या फोटोमध्ये हरमनप्रीत कौर विमानतळावरुन बाहेर येताना दिसत आहे. तर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दुसरा फोटो स्मृती मानधानाचा टाकला आहे. त्यामध्ये ती आपले सामान घेऊन विमानतळाच्या बाहेर येताना दिसत आहे. त्याचबरोबर सर्व खेळाडूंच्या तोंडावर काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे मास्क लावुन आलेले दिसले.
📸 📸: Mr @VVSLaxman281 – Head Cricket, NCA – interacts with the Sri Lanka-bound #TeamIndia, led by @ImHarmanpreet. 👍 👍 pic.twitter.com/yVQNGjHaD8
— BCCI Women (@BCCIWomen) June 18, 2022
भारतीय महिला संघ श्रीलंके विरुद्ध ३ टी२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका २३ जुनपासून सूरु होईल. श्रीलंका दौऱ्याची सुरुवात टी२० सामन्यांनी होईल. पहिला टी२० सामना हा २३ जुनला दांबुलाला खेळला जाईल. तर पुढचे दोन सामने २५ आणि २७ तारखेला खेळले जातील.
३ एकदिवसीय सामने १ जुलै ते ७ जुलै दरम्यान खेळवले जातील. हे एकदिवसीय सामने पल्लीकल येथे १ जुलैला खेळला जाईल. तर ४ जुलै आणि ७ जुलैला दुसरा व तिसरा सामना खेळला जाईल.
तत्पु्र्वी, श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होण्याअगोदर नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीचे (NCA) प्रमुख आणि भारताचा माजी खेळाडू वीवीएस लक्ष्मणची भेट घेतली. मिताली राजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिल्यानंतर चयन समितीने टी२० संघाची कर्णधार आणि आक्रमक खेळाडू हरमनप्रीत कौरला भारतीय महिला संघाचे कर्णधारपद दिले आणि श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या मालिकेत हरमनप्रीत कौरला एकदिवसीय संघाचे कर्णधार म्हणून घोषित केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
INDvsSA | कर्णधार म्हणून कोहली, धोनीकडूनही जे नाही झाले; ते करत इतिहास रचणार रिषभ पंत