टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारताची संमिश्र सुरुवात झाली. भालाफेकीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मात्र, त्यानंतर दुसरा भालाफेकपटू शिवपाल सिंग खास कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे तो ऑलिंपिकमधून बाहेर पडला. यानंतर पुन्हा चांगली बातमी मिळाली ती, पुरुष कुस्तीमधून. भारताची कुस्तीपटू रवी कुमार दहियाने बल्गेरियाच्या कुस्तीपटूला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवले. आता पुन्हा वाईट बातमी येतेय. महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या १/८ फायनल राऊंडमध्ये ऑलिंपिक पदार्पण करणाऱ्या भारताच्या अंशू मलिकचा बेलारूसच्या इरियानाने दारुण पराभव केला.
अनुभवी आणि मानांकित ३ क्रमांकाची इरियानाने अंशूला पूर्णपणे नवोदित सिद्ध केले आणि तिला ८-२ ने पराभूत करत सामना आपल्या नावावर केला. (Indian wrestler Anshu Malik losses to Iryna Kurachkina of Belarus in women’s freestyle (57kg) 1/8 Final)
Anshu Malik loses to Iryna Kurachkin 8-2 in a hard-fought match.
Stay tuned for more updates. #Cheer4India— SAI Media (@Media_SAI) August 4, 2021
आताही जिंकू शकते कांस्य पदक
जरी ती आपला पहिला सामना पराभूत झाली असली, तरीही तिच्याकडे अजूनही कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. जर इरियाना फायलनमध्ये पोहोचली, तर अंशूला रेपचेज राऊंडमध्ये उतरण्याची संधी मिळेल, जो कांस्य पदकासाठी खेळला जातो.
महत्त्वाच्या बातम्या-
-लय भारी! रवी दहियाने कोलंबियाच्या कुस्तीपटूवर मिळवला १३-२ ने एकतर्फी विजय; गाठली उपांत्यपूर्व फेरी
-व्वा रे पठ्ठ्या! भालाफेक खेळातून इंडियाला पदकाची आशा, नीरज चोप्राने मिळवलं फायनलचं तिकीट
-पहिल्या प्रयत्नात १९.९९ चा थ्रो, नंतर सलग दोन फाऊल; तजिंदरपाल सिंग पडला ऑलिंपिकमधून बाहेर