---Advertisement---

जागतिक पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी अमेरिकेत दाखल; हॉटेलमधून फोटो केला शेअर

On: बुधवार, डिसेंबर 9, 2020 7:14 PM
---Advertisement---

सर्बिया येथील बेलग्रेड येथे 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत वैयक्तिक विश्वचषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेणारे भारतीय कुस्तीपटू कसून सराव करत आहेत. नुकताच लग्नबंधनात अडकलेला भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेला रवाना झाला होता. अमेरिकेत दाखल होताच त्याने त्याचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

बजरंग पुनिया अमेरिकेत दाखल

जागतिक पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत दाखल झाला. 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘प्रोरेसलिंग 8 मॅन चॅलेंज’मध्ये बजरंग भाग घेणार आहे. ही स्पर्धा टेक्सास येथे खेळली जाईल.

अमेरिकेतून शेअर केला फोटो

अमेरिकेला पोहचताच बजरंगने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. अमेरिकेतील ग्रॅज्युएट आन आर्बर या प्रसिद्ध हॉटेलमध्ये तो एका खुर्चीवर बसला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य आहे.

https://www.instagram.com/p/CIa1mFYgaOZ/?utm_source=ig_web_copy_link

बजरंग प्रशिक्षणानंतर स्पर्धेत घेईल सहभाग

अमेरिकेत काही दिवस बजरंग प्रशिक्षण घेईल, त्यानंतर तो स्पर्धेत भाग घेईल, ज्यामध्ये 70 किलो वजनगटातील 8 कुस्तीपटू सहभागी होतील. बजरंगचे प्रशिक्षक शाको यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेतील विजयी कुस्तीपटूला 25000 डॉलर्स ही रक्कम मिळेल. उपविजेत्या कुस्तीपटूला 15000 डॉलर्स, तर तिसर्‍या क्रमांकावरील कुस्तीपटूला 10000 डॉलर्स मिळतील.

स्पर्धेनंतर बजरंग पुन्हा घेईल प्रशिक्षण

या स्पर्धेनंतर बजरंग महिनाभर प्रशिक्षण घेणार आहे. मिशिगन विद्यापीठाजवळ 8-10 सहकाऱ्यांसमवेत तो प्रशिक्षण घेणार आहे. याबद्दल बोलताना बजरंग म्हणाला की, “या स्पर्धेनंतर मी मिशिगन विद्यापीठाजवळ असलेल्या प्रशिक्षण केंद्रात जाईल. हे एक महिन्याचे प्रशिक्षण सत्र असेल. त्यांनी मला आश्वासन दिले आहे की सराव करण्यासाठी 8 ते 10 सहकाऱ्यांची सोय ते माझ्यासाठी करतील.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---