भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो फ्री स्टाईल फायनल सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयानंतर सुवर्णपदकाची आस लावून बसलेल्या भारतीयांना मोठा धक्का बसला. विनेश अंतिम सामना खेळली असती तर, तिने सुवर्णपदक नक्कीच मिळवले असते, अशी चाहत्यांना खात्री होती. मात्र, 100 ग्रॅम अधिक वजनामुळे तिला अपात्र ठरवले गेले. विनेशसोबत घडलेल्या या प्रकारानंतर भारताची युवा कुस्तीपटू शिवानी पवारने (Shivani Pawar) आता अनेक मोठे खुलासे केले आहेत.
मध्य प्रदेशच्या उमरेठ या छोट्याशा गावातील कुस्तीपटू शिवानी पवारने एका मुलाखतीत सांगितले की, “आमची ऑलिम्पिक चाचणी सुरू होती. तिथे असे काही घडले की मला संधी मिळाली नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले. मी या गोष्टींना विरोधही केला होता. मात्र, कोणीही माझी साथ दिली नाही.”
शिवानी म्हणाली की, “आयओएने ऑलिम्पिकसाठी ट्रायल्स घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या नियमानुसार, एक कुस्तीपटू कोणत्याही एकाच वजनी गटात खेळू शकतो. मात्र, विनेशला दोन वजन गटात खेळवण्यात आले. ती 50 किलो आणि 53 किलो वजनी गटातही खेळली. मी या गोष्टींना विरोध केल्यानंतरही स्पर्धा घेण्यात आल्या. विनेश आणि मी अंतिम फेरीत पोहोचलेले. मी सामन्यात पाच गुणांच्या फरकाने पुढे होती. मात्र, अचानक माझ्या विरोधात गुण देण्यात आले आणि शेवटी विनेशला विजयी घोषित केले गेले. याविरोधात मी भारतीय कुस्ती संघटना आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे तक्रारही केली होती.”
Listen to Shivani Pawar’s story in context of all the talks surrounding Vinesh Phogat, and how she was robbed of the entry to the 50kg category Olympic wrestling.. pic.twitter.com/ErJc9k3FcS
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) August 10, 2024
शिवानी हिने यासोबतच ऑलिम्पिकमध्ये विनेशसोबत घडलेला प्रकार निराशाजनक असल्याचे म्हटले. भारताचे एक पदक कमी झाल्याचे दुःख असल्याचे तीने म्हटले. तसेच, विनेशने ऑलिम्पिकसाठी मोठी मेहनत केल्याचे तिने सांगितले. विनेशने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केल्याने, आता या वजनी गटात शिवानी भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
सायना नेहवालचे जसप्रीत बुमराहला चॅलेंज! म्हणाली, “तो माझ्या स्मॅशसमोर टिकू शकणार नाही”
“मला ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे” दिग्गज फिरकीपटूनं व्यक्त केली इच्छा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल, पदकांचा रंग एका आठवड्यात उडाला!